फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल
फुटबॉल

फुटबॉल

sakal_logo
By

२७२१५
कोल्हापूर : नेताजी तरुण मंडळ आयोजित नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेत सोमवारी पाटाकडील तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

पीटीएम अंतिम फेरीत
शिवाजी तरुण मंडळाशी विजेतेपदासाठी आज भिडणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : पाटाकडील तालीम मंडळाने आज दिलबहार तालीम मंडळ संघावर २-१ अशी मात करत नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत त्यांची लढत सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या शिवाजी तरुण मंडळाशी उद्या संध्याकाळी चारला रंगणार आहे.  
दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाटाकडील व दिलबहारमध्ये चुरस होती. सुरुवातीपासून दिलबहार संघाने वर्चस्व ठेवले. आक्रमक पवित्रा व सूत्रबद्ध खेळ यामुळे पाटाकडीलच्या खेळाडूंचा कस लागत होता; मात्र पाटाकडीलच्या बचाव फळीने उत्तम खेळ करत दिलबहारला गोल नोंदवण्याची संधी दिली नाही. सामन्याच्या ३० व्या मिनिटाला दिलबहारच्या पवन माळी याने ओमकार जाधव याला अवैध्यरीत्या अडवल्यामुळे पाटाकडीलला पेनल्टी बहाल करण्यात आली. यावर ऋषभ ढेरे याने गोल नोंदवत सामन्यात १-० अशी संघाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात गोल फेडण्याच्या उद्देशाने दिलबहार संघाने पुन्हा आक्रमक चाली रचल्या; मात्र पाटाकडीलने अधिक आक्रमक खेळ केला. एका पाठोपाठ एक आक्रमणे हेच पाटाकडीलच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरले. यामध्ये ओमकार पाटील याने ६० व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात २-० असे संघाला आघाडीवर नेले. पाठोपाठ दिलबहारच्या स्वयम साळोखे याने ६२ व्या मिनिटाला गोल नोंदवून गोल फरक एकने कमी केला; त्यानंतर त्यांना बरोबरी साधता आली नाही. अखेर पाटाकडीलने २-१ असा सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

खेळाडू भिडले
सामना संपण्यास काही वेळ शिल्लक असताना दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांशी भिडले. चेंडूवर ताबा घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या खेळावर आक्षेप नोंदवत थेट अंगावर जाण्याचा प्रकार झाला. यावेळी इतर खेळाडूही एकत्र आल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मुख्य पंच, सहायक पंचांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65419 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top