जपानमध्ये शिवराज्याभिषेक दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जपानमध्ये शिवराज्याभिषेक दिन
जपानमध्ये शिवराज्याभिषेक दिन

जपानमध्ये शिवराज्याभिषेक दिन

sakal_logo
By

27218
----------
जपानमध्ये शिवराज्याभिषेक दिन
इचलकरंजी ः संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशात आणि जगभरातील विविध देशांत शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. जपानमधील भारतीय दूतावास आणि भारत कल्चरल सोसायटीने संयुक्तपणे टोकियोमध्ये प्रथमच शिवराज्याभिषेक दिन साजरा केला. भारतीय दूतावासाच्या विवेकानंद कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे भारताच्या जडणघडणमध्ये योगदान’ या विषयावर दूतावासाच्या उपप्रमुख मयांक जोशी, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून मिळणारे मॅनेजमेंट धडे’ या विषयावर विकास रंजन यांनी व्याख्यान दिले. हर्षल खोले यांनी कवी भूषण यांच्या कवितांचे वाचन, टोकियो लेझीम पथकाने लेझीम नृत्य, राजेश आवाके यांनी पोवाडा आणि लहान मुलांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ या गाण्यावर नृत्य सादर केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65420 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top