
तीन बातम्या
आदर्श कुमार गोएल जिल्हा दौऱ्यावर
कोल्हापूर : राष्ट्रीय हरित लवादचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोएल हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी (ता.९) दुपारी 3.30 वाजता कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम, शुक्रवार (ता.10) जूनला सकाळी 9 वा. साताराकडे प्रयाण असा कार्यक्रम आहे.
-
न्यायमूर्ती नागरत्न जिल्हा दौऱ्यावर
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रविवार (ता.12) जून दुपारी 12.30 वाजता करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर येथे आगमन व दर्शन. दुपारी 3 वाजता कोल्हापूर येथून धारवाडकडे प्रयाण होणार आहे
-
त्या’ वाहनांचा लिलाव 15 जूनला
कोल्हापूर : थकीत मोटार वाहन कराअभावी व खटला विभागाच्या केसेससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने अटकावून ठेवलेली आहेत. अशा वाहनांचा लिलाव 15 जून ला सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत ई-लिलाव पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक पाटील यांनी दिली.
इच्छुकांनी होम पेजवर ‘Bidder enrollmant’ ह्या पर्यायावर नोंदणी करावी. www.eauction.gov.in या संकेतस्थळावर 7 जून पासून माहिती उपलब्ध आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65467 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..