
कोथळीसाठी होडीची मागणी
27451
----------------
कोथळीसाठी होडीची मागणी
---
संभाव्य महापुराबाबत आढावा बैठक; पूरपट्ट्यातील लोकांची नावे देण्याची सूचना
दानोळी, ता. ७ ः कोथळी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीत संभाव्य महापुराबाबत आढावा बैठक सरपंच भरतेश खवाटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महापूर आल्यावर घ्यावयाची काळजी, त्याचबरोबर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक यांनी विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.
सरपंच खवाटे यांनी संभाव्य पूर परिस्थितीचा आढावा घेत कोथळीसाठी शासनाकडून होडीची मागणी करण्याचे सुचविले. तसेच, पूरपट्ट्यातील अनेक घरे धोकादायक आहेत. त्या घरातील लोकांचे स्थलांतर करण्यासाठी त्यांची नावे ग्रामपंचायत प्रशासनाला कळविण्याची सूचना अंगणवाडी सेविकांना केली. महापुरावेळी गावात वायरमनने पूर्णवेळ थांबणे, त्याचबरोबर खाली बुडत असलेली डीपी वर घेण्याचेही आदेश दिले. मराठी शाळा व मंगोबामाळ शाळा येथे स्थलांतरित होत असलेल्या पूरग्रस्तांसाठी सामूहिक स्वच्छतागृहाची मागणी केली, त्याबद्दल जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचनाही केल्या. पूर ओसरल्यावर स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही दिल्या. उपसरपंच राजश्री सुतार, ग्रामविकास अधिकारी नाईक, वायरमन अनिल कांबळे आदी उपस्थित होते. विजय खवाटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनमोल करे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65604 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..