नंग्या तलवारी घेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नंग्या तलवारी घेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न
नंग्या तलवारी घेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न

नंग्या तलवारी घेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न

sakal_logo
By

२७४८९
कोल्हापूर ः येथे यादवनगरात सोमवारी रात्री उशिरा टोळक्याने केलेली वाहनांची तोडफोड. घटनास्थळी पडलेली तलवारीची मूठ व चप्पल.

नंग्या तलवारी घेऊन
दहशत माजविण्याचा प्रयत्न
---
यादवनगरात प्रकार; १० ते १२ वाहनांची तोडफोड, टोळक्याचे कृत्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः यादवनगरात टोळक्याने हातात नंग्या तलावरी घेऊन वाहनांची तोडफोड करीत दहशत माजवली. तोडफोडीत १० ते १२ वाहनांचे नुकसान झाले. रात्री उशिरा घडलेल्या या दोन्ही वेगवेगळ्या प्रकारांची नोंद जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.
यादवनगरातील प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितले, की मद्यप्राशन केलेले एक टोळके मध्यरात्री यादवनगरात शिरले. त्यांच्या हातात नंग्या तलवारी होत्या. टोळक्याने शिवीगाळ करीत तलवारीने रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली. या वेळी भयभीत झालेल्या महिलांनी आरडाओरड केली. त्याने परिसरात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे हा प्रकार सुरू होता. यानंतर हल्लेखोरांना रोखण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले, तसा हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. मात्र, हल्ल्यात दहा ते बारा वाहनांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नुकसान झालेल्या वाहनांचा पंचनामा केला. त्यानंतर हल्लेखोरांचा शोध सुरू केला. यासंबंधी मोहसीन मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मुजम्मील खुदबुद्दीन कुरणे (वय ३०, रा. यादवनगर), शाहरूख मुराद मोमीन (२८, रा. सुभाषनगर) आणि चार ते पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
---
चप्पल आणि काचांचा सडा
घटनास्थळी तोडफोड करण्यात आलेल्या एका मोटारीजवळ तलवारीची मूठ व चप्पल पडले होते. तसेच, जागोजागी वाहनांच्या काचांचा ढीग पडलेला होता.

रेसकोर्स नाक्यावर प्राणघातक हल्ल्यात दोघे जखमी
रेसकोर्स नाका येथे काल (ता. ६) रात्री पूर्ववैमनस्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणी दहा जणांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. बंडा चौगुले, सौरभ लोखंडे, विश्वजित चौगुले, गजानन गणाचार्य, सागर चौगुले, संजय आवळे, पृथ्वी आवळे, विलास आवळे, सरदार आवळे, निवास आवळे (सर्व रा. वारे वसाहत परिसर) अशी त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की खंडू अशोक माने (वय ४०) वारे वसाहत येथे राहतात. ते पेंटर आहेत. ते काल रात्री सव्वाअकराच्या सुमारास मित्र वैभव कुरणे यांच्याबरोबर रेसकोर्स नाका येथे गेले होते. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून संशयितांनी त्यांच्यावर एडका, चाकू, स्टीक आणि काठ्यांनी हल्ला केला. त्यात माने आणि कुरणे गंभीर जखमी झाले. याबाबत माने यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांवर प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65641 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top