कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा निवेदन
कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा निवेदन

कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा निवेदन

sakal_logo
By

कोल्हापूर-अहमदाबाद
विमानसेवा दररोज सुरू व्हावी

अरिहंत जैन फौंडेशनतर्फे केंद्रीय मंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर, ता. ७ ः कोल्हापूर-अहमदाबाद ही विमानसेवा दररोज सुरू व्हावी, अशी मागणी अरिहंत जैन फौंडेशनतर्फे केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री जोतिरादित्य शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोल्हापूर- मुंबई विमानसेवा पूर्ववत करावी, कोल्हापूर भारतातील प्रमुख शहरांशी हवाईमार्गे जोडले जावे, अशाही मागण्या निवेदनात केल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातील गूळ अहमदाबाद बाजारपेठेत निर्यात होतो. सांगली, सातारा जिल्ह्यांत हळदीचे उत्पादन होते. हळद व कोल्हापुरात तयार होणाऱ्या चांदीच्या अलंकारांची गुजरात ही बाजारपेठ आहे. सुरत येथील कापड बाजारपेठेतून साड्या व कापडाची सांगली, कोल्हापूर येथे आवक होत असते. या सर्व बाजारपेठांमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, राजकोट, सुरत, अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांना गुजरात व महाराष्ट्रात प्रवास करावा लागतो. गुजरात, राजस्थान, कच्छ येथील एक लाखापेक्षा अधिक लोक व्यवसाय, नोकरीच्या निमित्ताने दक्षिण महाराष्ट्रात स्थायिक आहेत. या सर्व लोकांना त्यांच्या मूळ गावी तसेच धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी प्रवास करावा लागतो. सध्या कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा सुरू असली तरी ती दररोज सुरू झाल्यास लोकांची सोय होणार आहे. फौंडेशनचे अध्यक्ष जयेश ओसवाल, कार्यवाह अशोक ओसवाल, खजानीस राजेंद्र ओसवाल आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65723 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top