बांधकाम कामगार मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम कामगार मोर्चा
बांधकाम कामगार मोर्चा

बांधकाम कामगार मोर्चा

sakal_logo
By

27597

माध्यान्ह भोजन बंद करून
धान्य स्वरूपात मदत द्यावी

आरपीआय कामगार आघाडीचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः बांधकाम कामगारांचे माध्यान्ह भोजन बंद करून धान्य स्वरूपात कामगारांना मदत द्यावी, घरकुल व मेडिक्लेम योजना तत्काळ सुरू व्हावी, कोल्हापूर कार्यालयात नोंदणीपत्रे मिळावीत, आदी प्रलंबित मागण्यांसाठी आज बांधकाम कामगारांनी इशारा मोर्चा काढला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीच्या वतीने हा मोर्चा निघाला.
दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. व्हीनस कॉर्नरमार्गे शाहूपुरीतील कामगार आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा आला. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन कामगार मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले. कामगार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे म्हणाले, ‘‘बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करूनही शासनाने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे इशारा मोर्चा काढला. माध्यान्ह भोजन बंद करून धान्य स्वरूपात मदत मिळावी, यासह अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा होता. महिन्याभरात जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर मोर्चा काढणार आहोत.’’ प्रदीप मस्के, अशोक कांबळे, कृष्णा लोखंडे, रवींद्र पाटील, पांडुरंग चव्हाण, खुतबुद्दीन नायकवडी, गणपती कांबळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65815 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top