मार्केट यार्ड येथे तलाठी कार्यालय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मार्केट यार्ड येथे तलाठी कार्यालय करा
मार्केट यार्ड येथे तलाठी कार्यालय करा

मार्केट यार्ड येथे तलाठी कार्यालय करा

sakal_logo
By

२७५७४

मार्केट यार्डात तलाठी कार्यालय
करण्याची भाजपने केली मागणी

कोल्हापूर, ता.७ - टेंबलाईवाडी, विक्रमनगर येथील सुमारे २० हजार लोकसंख्या असलेल्या उपनगरातील नागरिकांना मार्केट यार्ड येथील कार्यालय तातडीने सर्व्हे झालेल्या विक्रमनगर येथील जागेत मंजुर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी राजाराम मंडलच्या शिष्टमंडळाने आज निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की जाधववाडी सध्याचे कार्यालय मार्केट कमिटीच्या गाळ्यात भाडेतत्वावर आहे. तेथे सुविधा नाहीत. आम्ही चार वर्षापूर्वी नवीन कार्यालयासाठी प्रयत्न केले. त्यानुसार विक्रमनगर येथील रि.स.नं. ३३८ सरकारी गायरान येथील जागेचा सर्व्हे करून व करवीर सर्कल मार्फत पंचनामा करून जागा निश्‍चित करून मंजुरी दिली आहे. जाधववाडी सज्जास जाधववाडी नाव असले तरीही प्रत्यक्षात टेंबलाईवाडी, विक्रमनगर येथीन ९० टक्के मिळकती आहेत. त्यामुळे नवीन जागेत हे कार्यालय मंजुर करावे अशी मागणी करण्यात येत असल्याचे रविंद्र मतगी यांनी म्हटले आहे.
देवदास औताडे, दिलीप मैत्राणी, सुनीलसिंह चव्हाण, रवींद्र राणे, दिलीप बोंद्रे, मानसिंग पाटील, किरण तासगावे, प्रदीप पाटील, श्रीरंग पाटील, माणिक बाकळे, उत्तम सावंत, संतोष कदम, अमोल सोनुले, नितीन देसाई यांच्या सह्या निवेदनावर आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65820 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top