केशव जाधव अंवर सचिवपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशव जाधव अंवर सचिवपदी
केशव जाधव अंवर सचिवपदी

केशव जाधव अंवर सचिवपदी

sakal_logo
By

27599
कागलचे केशव जाधव
‘ग्रामविकास’च्या अवर सचिवपदी
कोल्हापूर, ता. ७ : कागल येथील केशव जाधव यांची मंत्रालयातील ग्रामविकास विभागात अवर सचिवपदी नियुक्ती झाली आहे. श्री. जाधव यांनी मंत्रालयातील गृहनिर्माण, नगर विकास, उच्च व तंत्र शिक्षण, तसेच कामगार विभागात काम केले आहे. २०१६ ते २०१८ दरम्यान त्यांनी कोल्हापूर पुरालेखागार या विभागीय कार्यालयात सहसंचालक या पदावर काम केले. या काळात राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावर प्रकाश टाकणाऱ्या दुर्मिळ कागदपत्रे व दस्तऐवजांचे जिल्हाभर विविध ठिकाणी प्रदर्शने आयोजित केली. महाराजांचे कार्य जिल्ह्यातील युवक व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर शासनाच्या वतीने छत्रपती राजाराम महाराजांचे पत्रव्यवहार व भाषणांचा संग्रह असणारा ‘छत्रपती राजाराम महाराजांचे विचार’ हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65823 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top