गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

27611
हिरलगे : जिजामाता महिला दूध संस्थेच्या संगणकीकरणाचे उद्‌घाटन करताना अंजना रेडेकर. शेजारी उज्ज्वला देसाई, वंदना घेवडे, रूपाली गायकवाड, सचिन देसाई, प्रवीण देसाई आदी.

जिजामाता संस्थेच्या संगणकीकरणाचा प्रारंभ
गडहिंग्लज : हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथील जिजामाता महिला दूध संस्थेचे संगणकीकरण करण्यात आले. त्याचा प्रारंभ जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) संचालिका अंजना रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा उज्ज्वला देसाई अध्यक्षस्थानी होत्या. रेडेकर म्हणाल्या, ‘‘संगणकामुळे आपणास दुधाचे योग्य वजन, योग्य फॅट, योग्य एसएनएफ मिळणार आहे. त्याचा दूध उत्पादकांना फायदा होईल.’’ उपाध्यक्षा वंदना घेवडे, संचालिका रूपाली गायकवाड, अरुणा कुंभार, वीणा यादव यांच्यासह सर्व संचालिका, पोलिसपाटील दमयंती यादव, सुनीता देसाई, रूपाली कुपेकर, विजया देसाई, छाया देसाई, सुहासिनी घाटगे, शोभा देसाई, संगीता कुंभार, नाजूका यादव, गीता घाटगे, संगीता साने, अनुसया देसाई, बेबीताई कुपेकर, सरपंच सचिन देसाई, प्रवीण देसाई, उपसरपंच संदीप कुंभार, राजाराम देसाई, सुनील घेवडे, विठ्ठल देसाई, प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते. सेवा संस्थेचे अध्यक्ष उदयसिंग घाटगे यांनी स्वागत केले. गोविंद शिंदे यांनी आभार मानले.
----------------
27612
प्रमिला पारळे, इंदूबाई रायकर

शिप्पूर संस्थेच्या अध्यक्षपदी पारळे
गडहिंग्लज : शिप्पूर तर्फ आजरा (ता. गडहिंग्लज) येथील श्री रामलिंग विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी प्रमिला पारळे यांची, तर उपाध्यक्षपदी इंदूबाई रायकर यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर महिलांना संधी मिळाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी एफ. डी. जमादार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी पार पडल्या. निवडीनंतर सौ. पारळे व सौ. रायकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक शिवाजी केसरकर, संजय कोकितकर, शामराव चाळक, शामराव दळवी, शशिकांत नरवडकर, कृष्णा पाटील, महादेव रायकर, शिवाजी रायकर, भैरू गुरव, संतोष पोवार आदी उपस्थित होते. सचिव वसंत पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65860 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top