१२ वी निकालात राज्यात कोल्हापुर विभागाचा क्रमांक घसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१२ वी निकालात राज्यात कोल्हापुर विभागाचा क्रमांक घसरला
१२ वी निकालात राज्यात कोल्हापुर विभागाचा क्रमांक घसरला

१२ वी निकालात राज्यात कोल्हापुर विभागाचा क्रमांक घसरला

sakal_logo
By

कोल्हापूरचा विभागाचा
निकाल ९५.७ टक्के
---
गत वर्षीच्या तुलनेत ४.६० ने घट; यंदाही मुलींचीच बाजी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा (बारावी) निकाल आज जाहीर झाला. यात कोल्हापूर विभागाची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही. राज्यात कोल्हापूर विभागाचा पाचवा क्रमांक आला असून, गेल्या वर्षी तो चौथा होता. विभागाचा निकाल ९५.७ टक्के लागला असून, त्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.६० टक्के इतकी घट झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२०, तर मुलांचे प्रमाण ९३.२६ टक्के आहे, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव दत्तात्रय पोवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनामुळे बारावीची परीक्षा २०२१ मध्ये झाली नव्हती. त्यानंतर या शैक्षणिक वर्षात ३ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत परीक्षा झाली. त्याचा निकाल आज दुपारी एकला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. कोकण विभागाने सलग दहाव्यांदा प्रथम येण्याचा मान पटकावला. त्यांचा निकाल ९७.२१ इतका आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्हा अव्वल असून, निकाल ९६.४१ टक्के आहे. सातारा ९४.२३, तर सांगलीचा निकाल ९३.९१ टक्के आहे. शिक्षण संचालक एम. जे. चोथे, सहसचिव डी. एस. पोवार, शिक्षणाधिकारी एम. एस. गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी (सातारा) रवींद्र खंदारे, लेखाधिकारी एस. एल. रेठके, सहसचिव एस. एस. कारंडे, वरिष्ठ अधिकारी एस. वाय. दुधगावकर उपस्थित होते.

जिल्हानिहाय निकाल असा

*जिल्हा *नोंदणी *परीक्षा दिलेले *उत्तीर्ण *टक्केवारी
*कोल्हापूर *५१,८०६ *५१,६०० *४९,७४८ *९६.४१
*सांगली *३३,३६५ *३३,२०१ *३१,१८० *९३.९१
*सातारा *३६,७५५ *३६,५३९ *३४,४३४ *९४.२३

जिल्ह्याचा शाखानिहाय निकाल असा
*जिल्हा *शाखा *नोंदणी विद्यार्थी *उत्तीर्ण *टक्केवारी
*कोल्हापूर *विज्ञान *२३,३११ *२३,१३५ *९९.३८
*कला *१४,०५८ *१२,७८० *९१.७३
*वाणिज्य *१२,१६९ *११,६४८ *९५.८७
*व्यावसायिक *२,०८१ *२,०१९ *९८.२९

*सांगली *विज्ञान *१६,६७६ *१६,४०५ *९८.५८
*कला *९,६६२ *८,३७८ *८७.९४
*वाणिज्य *५,४४३ *४,८९९ *९०.३७
*व्यावसायिक *१,६१६ *१,४९१ *९२.८३

*सातारा *विज्ञान *१७,१५४ *१६,९४४ *९८.९३
*कला *९,७९२ *८,२८३ *८५.७४
*वाणिज्य *८,२२७ *७,७७२ *९४.७६
*व्यावसायिक *१,५६८ *१,४२२ *९३.५१

कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन झाले. सर्व विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनसाठी आवश्यक साधने नव्हती. कोविडमुळे अकरावीची परीक्षा न झाल्याने लिहिण्याच्या सरावात खंड पडला होता. त्यामुळे निकालाची टक्केवारी कमी झाली असावी, असा अंदाज आहे. निकालाची सखोल माहिती घेऊन टक्केवारी कमी येण्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करू.
- दत्तात्रय पोवार, सचिव, विभागीय मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65919 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top