
जवान जाधव कुटुंबीयांना ५० लाखांचा धनादेश
27725
बसर्गे : जवान प्रशांत जाधव यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा धनादेश विवेक कुमारसिंह यांच्याकडून स्वीकारताना शिवाजी जाधव, पद्मा जाधव. शेजारी बँकेचे अधिकारी, भारती रायमाने व इतर.
जवान जाधव यांच्या कुटुंबीयांना
पन्नास लाखांचा धनादेश
स्टेट बँकेकडून विमा रक्कम सुपूर्द
सकाळ वृत्तसेवा
नूल : ता. ८ : लडाखमधील तुर्तक सेक्टरमध्ये लष्कराच्या बसला झालेल्या दुर्घटनेत बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील जवान प्रशांत जाधव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने ५० लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश प्रशांतचे वडील शिवाजी जाधव व पत्नी पद्मा जाधव यांनी स्वीकारला.
जवान जाधव यांचे गडहिंग्लज येथील स्टेट बँकेत डिफेन्स सॅलरी पॅकेजचे खाते आहे. या खात्यामध्ये त्यांचा पगार जमा होत होता. या पॅकेजमध्ये जवानांची देशभक्ती, धोका ओळखून स्टेट बँकेतर्फे त्यांचा विमा हप्ता दरवर्षी भरला जातो. नोकरीत असताना जवानाचा मृत्यू झाला तर विम्याची रक्कम त्यांच्या वारसदारांना दिली जाते. प्रशांत यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या विम्याचे ५० लाख रुपये केवळ आठ दिवसांत सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जाधव कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. यावेळी बँकेचे विभागीय व्यवस्थापक विवेक कुमारसिंह, बँकेचे मार्केटिंग मॅनेजर सुजित कुमारसिंह, गडहिंग्लज शाखेचे रीपूदमन आर्या, श्रीकांत धमनवार, प्रशांत कांबळे, शंतनु बढीये, प्रवीण गुरव, मनोज शिंदे यांच्यासह सरपंच भारती रायमाने, सागर शिंदे, सुभाष थोरात, सुनील भुईंबर, तलाठी धनश्री गवते, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y65936 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..