केडीसी बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीसी बातमी
केडीसी बातमी

केडीसी बातमी

sakal_logo
By

27802

पगारदार विमा योजनेतून
वारसांना दीड कोटी
जिल्हा बँकेत वितरण; पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते वाटप
कोल्हापूर, ता. ८ ः कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेकडून पगारदारासाठीच्या अपघाती विमा योजनेतून पाच मृतांच्या वारसदारांना दीड कोटीचे विमा सुरक्षेचे धनादेश दिले. संचालक मंडळाच्या बैठकीत संचालक व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते वारसदारांना धनादेश वाटप केले.
बँकेकडे पगारदार बचत खाती असलेल्या दादासाहेब आनंदा मोहिते (पेठवडगाव), अण्णासाहेब मल्लापा कोळी (गडमुडशिंगी), जोतिबा रामू कडगावकर (चंदगड), शैलजा कृष्णाजी पांडव (कुरुंदवाड), श्रीकांत शामराव वडेर (सौंदलगा) या माध्यमिक शिक्षकांचे अपघाती मृत्यू झाले होते. बँकेकडे पगार जमा होणाऱ्या १७ हजार नोकरदारांसाठी दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगातून अवघ्या ३०० रुपयांच्या हप्त्यामध्ये तीस लाखाची विमासुरक्षा देणारी योजना सुरू केली होती. यामुळे जिल्ह्यातील शिक्षक, व्याख्याते, कारखाना कर्मचारी, बँक कर्मचारी इत्यादी पगारदार खातेदारांना योजनेची अत्यल्प हप्त्यामध्ये ही सुविधा सुरू झाली आहे.
यावेळी भय्या माने, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे, विमा कंपनीचे विभागीय प्रबंधक धनंजय आगारी, व्यवस्थापक पी.एम. कालेकर, प्रशासकीय अधिकारी सुनिल कानेटकर, विमा प्रतिनिधी के. वाय. पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66021 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top