गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

२७९७४
गडहिंग्लज : उपशिक्षणाधिकारी पदी निवडीबद्दल राजश्री तेरणी यांचा सत्कार करताना डॉ. मंगलकुमार पाटील. शेजारी प्रा. अनिल उंदरे, डॉ. एन. बी. मासाळ आदी.

तेरणींचा ‘घाळी’मध्ये सत्कार
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी राजश्री तेरणी-पाटील यांची एमपीएससी परीक्षेद्वारे उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, प्रा. अनिल उंदरे यांच्या हस्ते सत्कार झाला. पाटील यांनी जिद्द, श्रम, प्रयत्न केल्यास यश निश्‍चित मिळत असून शॉर्टकट हा यशाचा मार्ग नसल्याचे सांगितले. विद्यार्थी कल्याण समितीतर्फे कार्यक्रमाचे नियोजन केले होते. डॉ. एन. बी. मासाळ यांनी स्वागत केले. प्रा. ए. बी. उंदरे यांनी आभार मानले. सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
------------------------------------------
२७९७५
सारिका शिंदे

साधना व्होकेशनल, कॉमर्स
विभागाचा शंभर टक्के निकाल
गडहिंग्लज : येथील साधना ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स (इंग्रजी माध्यम) व व्होकेशनल विभागाचा बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. कॉमर्स शाखेतून दर्शन शेटे (९३.८३), सारा बारदेस्कर (९३.३३) व हेमा देसाई (९१.५०) तर व्होकेशनल विभागात सारिका शिंदे (८०.३३), सानिका वाघे (७९), वसुधा पाटील (७८.१६) यांनी गुणानुक्रमे क्रमांक पटकावून यश मिळविले. संस्थेचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव जे. बी. बारदेस्कर, प्राचार्य गंगाराम शिंदे, पर्यवेक्षक आर. एन. पटेल, कॉमर्स विभागप्रमुख प्रा. अनिता पवार, व्होकेशनलचे प्रा. भरत काटे, प्रा. वैशाली भोसले, प्रा. डी. के. कुंभार यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
---------------------
गडहिग्लज प्रशालेचे चित्रकलेत यश
गडहिंग्लज : एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत गडहिंग्लजच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले. एलिमेंटरी परीक्षेत प्राची नाईक, कनिष्का सूर्यवंशी, सुजाता मेंडुले, रुतू रावण, तनिषा कुंभार, अस्मिता कांबळे, नम्रता नलावडे, रसिका यळगुडे, प्राची यळगुडे, राजवर्धन पुजारी, स्फूर्ती पाटील, वृषाली घाटगे, ममता कोकीतकर, विद्या सोलापुरे, शिल्पा रचन्नावर, तनुजा मुरुकुटे, एंटरमिजिएट परीक्षेत श्रद्धा होडगे, स्वरांजली जाधव, पूजा लोहार, अनुक्षा नावलगी, योगिता चौगुले, शिवाणी देसाई, तनुजा देवार्डे, साक्षी हालाटी, प्रियांका जरळी, गौरी कांबळे, संग्राम कांबळे, साक्षी मुरगी, मीलहा पठाण, शुभम पाटील, पूजा रावळ, रिद्धी साह, शुभम सावंत, धनश्री कोंडुस्कर, सार्थक कुंभार, सचिन मोहिते, प्रथमेश टिपकुर्ले, चंद्रशेखर भादवणकर यांनी यश मिळविले. कलाशिक्षक ए. ए. पोतदार यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक एस. एन. देसाई, पर्यवेक्षक पी. टी. पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.
----------------------
‘हसूरचंपू’मध्ये साळुंखेंची जयंती
गडहिंग्लज : हसूरचंपू येथील यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. बापूजी साळुंखे यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात आली. टी. एस. सुतार यांनी प्रतिमेचे पूजन केले. विना खानाई, महादेव खानाई यांनी बापूजींच्या कार्याची माहिती दिली. जे. जी. घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. एस. एस. घस्ती यांनी सूत्रसंचालन केले. श्री. मिश्रीकोटी यांनी आभार मानले. एस. एम. कोळी, बी. व्ही. कुट्रे, व्ही. एम. नाईक, एन. ए. गायकवाड, एस. जे. कांबळे यांची उपस्थिती होती.
-------------------------
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये स्थापना दिवस
गडहिंग्लज : अत्याळ येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शाळेचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. निवृत्त गटविकास अधिकारी लक्ष्मण माने प्रमुख पाहुणे होते. संस्थापक माजी आमदार स्व. दिनकरराव यादव यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. मुख्याध्यापक एन. एल. कांबळे यांनी स्वागत केले. सर्व शिक्षक, कर्मचारी व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
------------------
शिंदे हायस्कूलच्या जाधवचे यश
गडहिंग्लज : येथील वि. दि. शिंदे हायस्कूलमधील माजी विद्यार्थी संकेत जाधव याने एनडीए परीक्षेत यश मिळाले. यापूर्वी शाळेचा माजी विद्यार्थी अक्षय सबनीसची एनडीएमध्ये निवड झाली आहे. जाधव याच्या रुपाने शाळेतील सलग दुसरा विद्यार्थी यश मिळविल्याने कौतूक होत आहे. वक्तृत्व स्पर्धा, बौद्धीक स्पर्धा, सामान्यज्ञान परीक्षा, खेळ, बाल वैज्ञानिक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या शाळेतील उपक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना होत असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. मुख्याध्यापक, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल कौतूक होत आहे.
---------------------
‘क्रिएटिव्ह’चा शंभर टक्के निकाल
गडहिंग्लज : येथील क्रिएटिव्ह ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयाचा सलग सातव्या वर्षीही शंभर टक्के निकाल लागला. धैर्य रेडेकर (८३.३३), अनूज पोवार (८२.१७), अमृता सागर (८२) या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावून चांगले यश मिळविले. इतर सर्व विद्यार्थीही विशेष प्रावीण्य व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. संस्थाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई, सचिव आण्णासाहेब बेळगुद्री, प्राचार्य दिनकर रायकर यांचे प्रोत्साहन तर सौ. एस. एस. देसाई, एस. ए. कलकुटगी, सौ. एम. डी. भाईंगडे, एम. एन. मोटे, सौ. आर. आर. शिंदे या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. दहावीच्या निकालानंतर इच्छुक विद्यार्थ्यांनी अकरावी सायन्समध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन प्राचार्य दिनकर रायकर यांनी केले आहे.
----------------------
‘गडहिंग्लज’चा निकाल शंभर टक्के
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य व सायन्स या शाखांचा बारावीचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा ९७.४७ टक्के इतका लागला. कला विभागात पूनम कुंभार (७४.१७), ऋतूजा शिलेदार (७३.६७), श्रृती नाईक (७३.१७), वाणिज्य विभागातून दाही अत्तार (८८.१७), स्वाती गौरीमठ (८७.१७), सानिया टोपणकट्टी (७३.१७) तर विज्ञान शाखेत सायली पाटील (७७.६७), सुशिल सुपले (७६.८३), स्वराज्य राऊत (७६.६७) या विद्यार्थ्यांनी गुणानुक्रमे क्रमांक पटकावले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66243 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top