
आजरा ः हत्ती नुकसान बातमी
28022
बैलगाडीचा केला
टस्कराने खुळखुळा
घाटकरवाडीत प्रताप; ऊस, बांबू भुईसपाट
आजरा, ता. ९ ः घाटकरवाडी (ता. आजरा) येथे टस्कराने चांगलाच धुडघूस घातला आहे. ऊस, बांबूसह पिकांचे नुकसान करीत आहेत. जयवंत लक्ष्मण डेळेकर यांची बैलगाडी उसात भिरकावत तिचा खुळखुळा केला. बैलगाडीचे चाक मोडून नुकसान झाले आहे. त्याच्या रौद्ररूपाने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.
दोन दिवसांपासून टस्कर घाटकरवाडी परिसरात आहे. तो ऊस, बांबू पिकासह शेती उपयोगी साहित्याचे नुकसान करीत आहे. बुधवार (ता. ८) रात्री डेळेकर यांच्या शेतात उतरून बैलगाडी ओढत नेऊन भिरकावून दिली. बैलगाडीचे चाक मोडले असून, नुकसान झाले आहे. त्यांचा ऊस पिकाचेही नुकसान केले आहे. दोन दिवसांत निवृत्ती यादव, दीपक यादव, राजाराम पाटील यांच्या उसाचे नुकसान केले आहे. विठ्ठल अडकूरकर काजूची बाग व मेसकाठीचे नुकसान केले आहे. त्यांच्या वावराने शेतकरी हवालदिल झाला असून, त्याने रौद्ररूप धारण केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. त्याला परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. वनरक्षक राहुल कांबळे यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66313 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..