आरक्षणांची लॉटरी सोमवारी फुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरक्षणांची लॉटरी 
सोमवारी फुटणार
आरक्षणांची लॉटरी सोमवारी फुटणार

आरक्षणांची लॉटरी सोमवारी फुटणार

sakal_logo
By

आरक्षणांची लॉटरी
सोमवारी फुटणार
नगरपरिषद निवडणूक; जिल्ह्यातील नऊ पालिका
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ९ : मुदत संपलेल्या राज्यातील २०७ नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (ता. १३) नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, वडगाव, मलकापूर, पन्हाळा, गडहिंग्लज, कागल, मुरगूड व कुरुंदवाडचा समावेश आहे. आरक्षणाकडे आता इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, असा निर्णय घेत राज्य शासनाने प्रभाग रचनेपासून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापर्यंतचा अधिकार स्वत:कडे घेतला आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला कार्यक्रमाची सुरुवात करण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयानुसार निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा पहिला टप्पा पूर्ण करून आता आरक्षणांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दुसऱ्‍या बाजूला शासनाने ओबीसी लोकसंख्येची माहिती तत्काळ संकलित करण्याचे आदेश गावपातळीपर्यंतच्या यंत्रणेला दिला आहे. निवडणूक यंत्रणा या कामात गुंतली असून डाटा संकलनासाठी कर्मचाऱ्‍यांना पळविले जात आहे.
प्रभाग रचना, आरक्षणामुळे निवडणुका दृष्टिपथात येत असल्या तरी पावसाळ्यामुळे पुन्हा संभ्रमात भर पडली आहे. कारण, वीस दिवसांच्या आरक्षणाच्या कार्यक्रमानंतर १ जुलै रोजी त्याला अंतिम स्वरुप येणार आहे. यामुळे पावसाळ्यात निवडणुका होणार की नाहीत, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. त्याने इच्छुकांमधील धाकधूकही वाढतच आहे. निवडणुका कधी होणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. आता आरक्षण सोडत निघणार असल्याने इच्छुकांना हक्काच्या प्रभागाची चिंता वाढली आहे. सोमवारी निघणाऱ्‍या आरक्षणात आता अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्‍चित करण्यात येणार आहेत.


आरक्षणाचा कार्यक्रम
- १० जून : आरक्षणाच्या सोडतीची नोटीस प्रसिद्ध करणे
- १३ जून : नगरसेवकपदाच्या आरक्षणाची सोडत काढणे
- १५ ते २१ जून : आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती, सूचना मागविणे
- २४ जून : आरक्षण सोडतीचा अहवाल आयुक्तांकडे पाठविणे
- २९ जून : आरक्षणास आयुक्तांनी मान्यता देणे
- १ जुलै : अंतिम आरक्षणाला प्रसिद्धी देणे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66446 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top