विवेकानंद कॉलेज व्याख्यान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवेकानंद कॉलेज व्याख्यान
विवेकानंद कॉलेज व्याख्यान

विवेकानंद कॉलेज व्याख्यान

sakal_logo
By

डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणगंगा राज्यभर पोचविली
---
डॉ. रामचंद्र देखणे; डॉ. बापूजी साळुंखे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : ‘‘ज्ञानसाधनेतून माणूस सुखी व सामर्थ्यवान होतो. ज्ञानाच्याच आधारे समाजाचे जगणे सुसह्य होईल. त्यासाठी उपयुक्त ठरणारी संतांची जीवनमूल्ये आत्मसात करत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवली,’’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी आज येथे व्यक्त केले.
शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा १०४ व्या जयंती समारंभात ‘डॉ. बापूजी साळुंखे : शिक्षण व संत साहित्य’ या विषयावर ते बोलत होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. देखणे पुढे म्हणाले, ‘‘स्वामी विवेकानंद यांच्या शैक्षणिक विचारातच आधुनिक शिक्षण विचारांचा पाया होता. शिक्षणमहर्षी डॉ. साळुंखे यांनी तोच शिक्षणाचा विचार ग्रामीण भागात पोहचवला. बापूजींचे शैक्षणिक विचार हे भारतीय मूल्यांशी जोडणारे आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत बापूजींचे नाव आग्रहाने घ्यावे लागेल.’’
प्राचार्य साळुंखे म्हणाले, ‘‘बापूजींनी आयुष्यभर सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणुकीस आळा अशी मानवी मूल्ये जपली. त्याच्या आधारे श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था उभारली. संतांच्या तत्त्‍वज्ञानाचा प्रभाव बापूजींवर होता. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांची साधना करत चारित्र्यांची कास धरणारे गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी निर्माण करण्याचे कार्य बापूजींनी आयुष्यभर केले.’’
संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ प्रास्ताविक केले. प्राचार्या शुभांगी गावडे यांनी परिचय करून दिला. महेश गायकवाड, डॉ.कविता तिवडे यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव डॉ.एस.एम.गवळी यांनी आभार मानले. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, श्रीराम साळुंखे, हितेंद्र साळुंखे उपस्थित होते.

चौकट
गुणवंतांचा सत्कार अन् प्रदर्शन
या वेळी विवेकानंद कॉलेज व न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजच्या १२ वी बोर्ड परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या कला शिक्षकांनी भरवलेल्या चित्र-शिल्प प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66451 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top