यादवनगर हल्ला पाच जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यादवनगर हल्ला पाच जणांना अटक
यादवनगर हल्ला पाच जणांना अटक

यादवनगर हल्ला पाच जणांना अटक

sakal_logo
By

२८१३१

यादवनगरात दहशतप्रकरणी
पाच संशयितांना अटक
कोल्हापूर ः यादवनगरात हातात नंग्या तलवारी घेऊन दशहत माजविणाऱ्या पाच जणांना राजारामपुरी पोलिसांनी चौवीस तासात अटक केली. मुजम्मील खुद्दबुद्दीन कुरणे (वय ३५, रा. यादवनगर), शाहरूख मुराद मोमीन (वय २८), शहबाज मुराद मोमीन (वय ३२), प्रमोद बाळासाहेब गाडेकर (वय २४) आणि अक्षय विलास शिंदे (वय २३, सर्व रा. सुभाषनगर) असे त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार काल मध्यरात्री घडला होता. यामध्ये १३ वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. यामध्ये दीड लाखांचे नुकसान झाले होते. त्या पाच जणांना न्यायालयाने उद्या (ता.१०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे, अमंलदार रंगराव चव्हाण, रणजित साळवी, प्रवीण पाटील, विशाल खराडे, विशाल शिरगावकर, रवी आंबेकर, सचिन देसाई, नितीन मेश्राम यांनी केली.

27972
चंदगड येथे गोवा बनावटीची दारू पकडली
चंदगड ः चंदगड- चंदगडफाटा मार्गावर भवानी मंदिरानजीक बेकायदेशीरपणे विक्रीच्या हेतूने गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना पोलिसांनी पकडली. सुमारे पाच लाख ७४ हजार ८४ रुपयांची विविध प्रकारची दारू आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरलेली मोटार मिळून ९ लाख ७४ हजार ८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित आरोपी तुकाराम सुभाना कोले (मौजे शिरगाव, ता. चंदगड) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. चंदगड- चंदगडफाटा मार्गावर गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी एका गाडीतून आणली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. यामध्ये गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे. संशयित कोले मोटारीतून ही दारू विक्रीसाठी घेऊन चालला होता. माल खरेदी केल्याचा पुरावा त्याच्याकडे नव्हता. त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली. त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिस कॉन्स्टेबल संदीप कांबळे यांनी फिर्याद दिली. नाईक राजीव जाधव तपास करीत आहेत.

अत्याचार प्रकरणी तरुणावर गुन्हा
उजळाईवाडी ः अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी मैत्री करून हत्यारांची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. राहुल भैया सूर्यवंशी (मूळ गाव केनवडे, सध्या रा. पसरिचानगर, उजळाईवाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे, मार्च ते आठ जून या कालावधीत लॉजवर व संशयिताची मोटार (एमएच १० ई १५१४) मध्ये तामगाव तळ्यातजवळील उघड्या माळावर वारंवार अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पी. एस. पवार करीत आहेत.

२८१३९
मोटार अपघातात वृद्धाचा मृत्‍यू
कोल्‍हापूर : मोटार विद्युत खांबावर आदळून झालेल्या भीषण अपघातातील जखमींचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. महिपती रामचंद्र सुतार (वय ६१, पाचगाव) असे त्यांचे नाव आहे. काल रात्री पार्वती चित्रमंदिराशेजारी ही घटना घडली. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले, सुतार हे नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झाले आहेत. काल रात्री ते नातेवाईक सोडण्यासाठी मध्यवर्ती बस स्थानक येथे गेले होते. तेथून ते घरी परतत असताना हा अपघात घडला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी सीपीआरमध्ये दाखल केले होते.


बेपत्ता कामगाराची आत्महत्या
इचलकरंजी : गेल्या महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या वहीफणी कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. राजेंद्र बंडू कोळी (वय ५३ रा. गुरूकन्नननगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांत नोंद झाली आहे. राजेंद्र कोळी वहीफणी काम करत होते. २४ मे पासून ते बेपत्ता होते. चंदूर ओढ्याजवळ झुडपात त्यांचा मृतदेह मिळून आला. त्यांच्या गळ्यास आणि झुडपास नायलॉन दोरी दिसून आल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत मुलगा अक्षय कोळी याने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वर्दी दिली.

मोटारसायकल घसरून दोघे जखमी
कोल्‍हापूर : कुरुकली परिसरात मोटारसायकल घसरून दोघे जखमी झाले. आकाश विजय चव्‍हाण (वय २८, रा. आष्‍टा) व राहूल बाजीराव पाटील (२३, रा. कोतोली) अशी जखमींची नावे आहेत. दोघेही आदमापूर येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66456 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top