रिंकू देसाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिंकू देसाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
रिंकू देसाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

रिंकू देसाईचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

sakal_logo
By

रिंकू देसाईचा अटकपूर्व
जामीन अर्ज फेटाळला
कोल्हापूर, ता. १० ः लक्षतीर्थ वसाहत येथील प्राणघातक हल्ला प्रकरणातील संशयित विजय ऊर्फ रिंकू देसाईचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला, अशी माहिती तपासी अधिकारी उपनिरीक्षक इक्बाल महात यांनी दिली.
वाढदिवसाचा फलक फाडल्याच्या कारणातून १६ मे रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी संशयित रिंकूसह साथीदारांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी १४ संशयितांवर कारवाई केली. दरम्यान, रिंकूने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याचे महात यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66733 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top