शहीद जवानांचा कुटूंबियांना त्रास देणारा ग्रामसेवक निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहीद जवानांचा कुटूंबियांना त्रास देणारा ग्रामसेवक निलंबित
शहीद जवानांचा कुटूंबियांना त्रास देणारा ग्रामसेवक निलंबित

शहीद जवानांचा कुटूंबियांना त्रास देणारा ग्रामसेवक निलंबित

sakal_logo
By

ग्रामसेवक डवरीवर
निलंबनाची कारवाई
शहिदाच्या कुटुंबीयांना त्रास दिल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या व त्यांची बदनामी करणाऱ्या ग्रामसेवक राजेंद्र ऊर्फ दत्तात्रय शंकरनाथ डवरी (मुमेवाडी, ता. आजरा) याला जिल्हा परिषदेचे प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निलंबित केले.
पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यांशी लढताना जवान ऋषिकेश जोंधळे शहीद झाले. दरम्यान, ऋषिकेश यांच्या कुटुंबीयांनी ग्रामसेवक राजेंद्र डवरी त्रास देत असल्याची तक्रार केली होती. ‘‘तुझ्या मुलाला आम्ही देशासाठी मरायला सांगितले होते का? असा प्रश्‍न करत डवरी त्रास देत होता. दरम्यान, डवरी निलंबित काळात अर्धवेतनावर असताना जेवढे वेतन व भत्ते मिळाले असते, तेवढी रक्कम त्यांना निर्वाह भत्ता म्हणून आदा करायची आहे. निलंबन मुदतीत डवरी यांनी कोणत्याही खासगी किंवा शासकीय नोकरी तसेच व्यवसाय करायचा नाही. याबाबत प्रत्येक महिन्याला तसेच प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्यानंतर निलंबन कालावधीचा निर्वाह भत्ताही आदा करायचा आहे, असेही नमूद केले आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66761 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top