अरूधंती महाडिक मुलाखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरूधंती महाडिक मुलाखत
अरूधंती महाडिक मुलाखत

अरूधंती महाडिक मुलाखत

sakal_logo
By

२८५२४
28527


दिवस सरतो; पण रात्र सरत नाही!
अरुंधती महाडिक यांना हुरहूर; विमानतळासह प्रलंबित विविध प्रश्न मार्गी लावणार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः राज्यसभेच्या निवडणुकीत आपणच बाजी मारणार, असा विश्वास धनंजय महाडिक यांना होताच. फक्त मतमोजणीनंतरची घोषणा बाकी होती; मात्र मतदानावर आक्षेप घेतल्यानंतर काही काळ प्रचंड अस्वस्थतेत गेला. मतदानानंतर पाच वाजता मतमोजणीसाठी वेळ लागणार, हे कळल्यानंतर धाकधूक वाढली. मनात कोठेतरी हुरहूर होती. जसजसी रात्र होईल तसे ‘दिवस सरतो, पण रात्र सरत नाही’ याची क्षणाक्षणाला जाणीव होत होती. अखेर पहाटे सव्वातीनला धनंजय महाडिक यांनी बाजी मारल्याची घोषणा झाल्यानंतर डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, अशी भावूक प्रतिक्रिया धनंजय महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
अर्ज भरला, त्याचवेळी आमचा विजय पक्का होता. फक्त प्रतीक्षा होती ती अधिकृत घोषणेची; मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे थोडी धाकधूक होती. त्यानंतर काही काळ नाराज झालो. तो काळ आम्हासाठी कठीण होता, तरीही उमेद सोडली नाही. एकेकाळी सर्व महत्त्वाची पदे महाडिक कुटुंबीयांकडे होती. दोन-तीन वर्षांत कोणतेही पद नसले तरी समाजसेवा सोडली नाही. यातूनच आमच्या कामाविषयी, प्रामाणिकपणाविषयी लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि तोच विश्वास आज निकालानंतर अधोरेखित झाला आहे. कोल्हापूरकरांनी पहाटे केलेला जल्लोष पाहण्यासाठी काल साहेब नव्हते, मात्र उद्या (रविवारी) विजयाचा जल्लोष पाहून ते नक्की भारावून जातील, अशी आशाही महाडिक यांनी व्यक्त केली.
सौ. महाडिक म्हणाल्या, ‘‘पंधरा दिवसांपूर्वी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून धनंजय महाडिक यांची उमेदवारी जाहीर झाली. तेव्हापासून साहेब मुंबईला होते. फक्त आम्ही महिलाच घरी होतो. तिन्ही मुलेही साहेबांसोबत होते. आरोप-प्रत्यारोप होत होते. दूरध्वनी व टीव्हीवरूनच घडामोडीची माहिती मिळत होती. साहेबांना आत्मविश्वास होताच. दोन-तीन वर्षांतील पराभवाच्या दुष्टचक्रातून या निवडणुकीत बाहेर पडणार, अशी त्यांना खात्री होती. त्यांच्या बोलण्यातून याचा क्षणोक्षणी प्रत्यय येत होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी महाडिक यांना निवडून आणायचेच, याचा चंग बांधला होता. आम्हीही त्यांना पाठिंबा देत होतो. गेल्या दोन-तीन वर्षांमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोडा तणाव होता; पण ही स्थिती महाडिक यांनी साहेबां लीलया हाताळली. त्याची पोचपावती या निकालातून सर्वांसमोर आहे.’’


विकासकामे होतील
लोकसभेचे खासदार असताना बरीच विकासकामे धनंजय महाडिक यांनी मूर्त स्वरूपात आणली. विमानसेवा, कोकणला जोडणारी रेल्वे, बास्केट ब्रीज अशी कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक कामांची मुहूर्तमेढ रोवली होती. आता हीच कामे राज्यसभेतील खासदार म्हणून धनंजय महाडिक करतील, याची खात्री आहे, अशी भावना महाडिक यांनी व्यक्त केली.

पाच नाही, सहा वर्षे खासदार
श्री. महाडिक यांच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. यावेळी घोषणाही सुरू होत्या. राज्यसभेतील खासदारीकीचा कार्यकाल सहा वर्षांचा असतो आणि लोकसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो त्यामुळे पाच वर्षे नाही; आता सहा वर्षे खासदार ही घोषणा जोरात दिली जात होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66921 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top