चंद्रकांत पाटील यांची मुस्तदीगीरी फळाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील यांची मुस्तदीगीरी फळाला
चंद्रकांत पाटील यांची मुस्तदीगीरी फळाला

चंद्रकांत पाटील यांची मुस्तदीगीरी फळाला

sakal_logo
By

फोटो

चंद्रकांतदादांची मुत्सद्देगिरी फळाला
विरोधकांना दिले चोख उत्तर; महाडिकांना केंद्रीय मंत्री करण्याचा शब्द पाळावा लागणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ ः भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी चार वर्षांपूर्वी अंबाबाई मंदिरात धनंजय महाडिक केंद्रात भाजपचे केद्रीय मंत्री होतील, असे विधान केले होते. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतही महाडिकांना लवकरच दिल्लीत मोठी जबाबदारी मिळेल, असे सांगितले होते. धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार बनवून चंद्रकांत पाटील यांनी शब्द पाळला. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मातब्बरांना भाजपमध्ये आणण्याच्या दादांच्या मुत्सद्देगिरीला महाडिकांच्या रुपाने पुन्हा एकदा यश आले. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यात चंद्रकांत पाटील यशस्वी ठरले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून थांबल्यानंतर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात स्थायिक झाले. काही काळ स्वयंसेवक संघाचे काम केल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाचे काम सोपवले. पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्याने त्यांना आणखी बळ मिळाले. चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीपासूनच सहकारातील आणि राजकीय दृष्ट्या दबदबा असणारी मातब्बर मंडळी भाजपशी कशी जोडली जातील यासाठी प्रयत्न केले. २०१४ मध्ये मंत्री झाल्यानंतर तर त्यांनी सत्तेचा सकारात्मक उपयोग करून जिल्ह्यातील अनेक राजकीय घराण्यांना पक्षाशी जोडले. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यापैकीच एक. त्यानंतर विनय कोरे, प्रकाश आवाडे, अशोक चराटी यांनाही पक्षाशी जोडले. त्यामुळे जिल्ह्यात सहकारातही भाजपची फळी तयार झाली. २०१९ मध्ये धनंजय महाडिक हे जरी राष्ट्रवादीचे खासदार असले तरी त्यांची भाजपशी असणारी जवळीक सर्वश्रूत होती. जिल्ह्यातील राजकारणात आपल्या गटाचे अस्तित्व टिकवण्यासाठी महाडिक यांना असे राजकारण करणे अपरिहार्य होते. अंबाबाईला सोन्याची पालखी प्रदान करण्याचा सोहळा अंबाबाई मंदिरात होता. या सोहळ्याला तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या वेळी त्यांनी धनंजय महाडिक एक दिवस केंद्रात मंत्री होतील, असे विधान करून खळबळ माजवली. राष्ट्रवादीचे खासदार आणि केंद्रात मंत्री कसे होतील, असा प्रश्न अनेकांना पडला. पण त्यानंतर महाडिकांचा झालेला पराभव, त्यांचा भाजप प्रवेश आणि त्यानंतर मिळालेली राज्यसभेची खासदारकी हे सर्व पाहता दादांनी आपला शब्द खरा करून दाखवल्याचे दिसते. धनंजय महाडिक आत्ता जरी मंत्री नसले तर ते आता राज्यसभेचे खासदार झाले आहेत. भविष्यात त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले तर आश्चर्य वाटणार नाही.
कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतही भाजपच्या सत्यजीत कदम यांना तब्बल ७८ हजार मते मिळाली. यावरून शहरातही भाजपची राजकीय ताकद वाढल्याचे दिसून आले. यामध्येही दादांचा मोठा वाटा आहे. विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवून त्यांनी जिल्ह्यात भाजपचा सहानभूतीदार वर्ग निर्माण केला. धनंजय महाडिक यांन खासदार करून चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा आपली मुत्सद्देगिरी दाखवून दिली आहे.

दादांना अश्रू अनावर
धनंजय महाडिक यांना विजयी झाल्यानंतर विधानभवन कक्षामध्ये चंद्रकांत पाटील यांना प्रतिक्रिया देताना त्यांचे डोळे पाणावले होते. सातत्याने त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. विधानसभेपासून अगदी उत्तरच्या निवडणुकीत ही भाजपचा पराभव झाल्याने त्यांच्यावर टीका केली जात होती. अखेर महाडिक विजयी झाल्याने त्यांनी त्यांच्या विरोधकांना ही आपण ही पाटील असल्याचे दाखवून दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y66973 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top