​के.एस.ए. "सी'' डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

​के.एस.ए. "सी'' डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धा
​के.एस.ए. "सी'' डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धा

​के.एस.ए. "सी'' डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धा

sakal_logo
By

​सी डिव्हिजन लीग
फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
कोल्हापूर​, ता. ११ :​ कोल्हापूर स्पोर्ट्‌स ​असोसिएशन आयोजित ‘केएसए’सी डिव्हिजन लीग फुटबॉल ​स्पर्धेला सुरुवात झाली. पोलो ग्राऊंड व छत्रपती शाहू स्टेडियम ​येथे स्पर्धा सुरू आहे. ६७ संघांची २१ गटांत विभागणी झाली. २१ गटांतर्गत स्वतंत्रपणे लीग पद्धतीने सामने होणार आहेत. गुणानुक्रमे पहिला संघ असे एकूण २१ संघात बाद पद्धतीचे सामने ​खेळविण्यात येणार असून, बाद फेरीतील विजेता व उपविजेता हे दोन संघ याच वर्षी केएसए ‘बी’ डिव्हिजन गटासाठी पात्र ​ठरणार आहेत.​ ​लीग फेरीचे ७५ सामने व बाद फेरीचे २० सामने असे एकूण ९५ सामने ​खेळविले जाणार असून, ११ ते १६ जून या कालावधीत रोज १२ सामने होणार आहेत. ​आजच्या सामन्यात ​अलोच ग्रुप फुटबॉल क्लबने साईबाबा ग्रुपवर २-० अशा फरकाने विजय मिळविला​.​ भारतनगर फुटबॉल क्लबने ४-२ गोलफरकाने चिंतामणी ​मंडळवर​ टायब्रेकरमध्ये विजय मिळविला​.​ शालिनी पॅलेस ​मित्रमंडळाने १-० गोलफरकाने संयुक्त राजारामपुरीवर विजय मिळविला​.​ दत्त तरुण मंडळाने ३-१ गोलफरकाने मावळा ग्रुपवर विजय मिळविला​.​ वेताळमाळ तालीम मंडळाने २-१ गोलफरकाने शिवनेरी स्पोर्टस‌वर विजय मिळविला​.​ चंद्रमहाल तालीम मंडळाने ३-१ गोल​ फरकाने आर. के. स्पोर्टसवर विजय मिळविला​.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67021 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top