आजरा ः भादवण बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः भादवण बातमी
आजरा ः भादवण बातमी

आजरा ः भादवण बातमी

sakal_logo
By

ajr१२१०.jpg. भादवण (ता. आजरा) ः येथे पाणीपुरवठा योजनेतंर्गत उभारण्यात आलेला जलकुंभाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी सरपंच संजय पाटील. या वेळी उपसरपंच हरिबा कुंभार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर, ग्रामपंचायत सदस्य व अन्य.

पाणीपुरवठा योजनेचे
भादवणमध्ये लोकार्पण
भादवण, ता. १२ ः भादवण पैकी डोंगरवाडीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली आहे. याचा लोकार्पण सोहळा सरपंच संजय पाटील यांच्या हस्ते झाला. ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, ‘‘या योजनेसाठी ९ लाख ३६ हजार रुपये इतका खर्च आला आहे. ही योजना सुरळीत चालावी यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे. श्री. पाटील म्हणाले, ‘‘गेली सतर वर्ष डोंगरवाडीतील ग्रामस्थ शासनाच्या योजनेतून पाणी मिळावे अशी मागणी करीत होते. हिरण्यकेशी नदी व डोंगरवाडी हे अंतर जास्त असून उंचीही अधिक आहे. त्यामुळे या नदीवरून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. त्यामुळे भादवण येथील पूर्वीच्या योजनेतून डोंगरवाडी येथे छोट्या जलकुंभात पाणी साठवण करून ते कुंभार वसाहत येतील जलकुंभात टाकून सर्वच कुटुंबाना पाणी पुरवण्याची व्यवस्था जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आली आहे. ही योजना शाश्वत रहावी यासाठी कटिबद्ध आहे. जागा उपलब्ध करून देणाऱ्यांचा सत्कार झाला.’’ रणजित गाडे म्हणाले, ‘‘डोंगरवाडी येथील पाणी योजनेतून ग्रामस्थांची पाण्याचे संकट दूर होईल. येथील विविध विकासकामे करण्यासाठी सरपंच पाटील यांच्या पाठीशी राहा असे आवाहन केले.’’ उपसरपंच हरिबा कुंभार, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा पाटील, सुनंदा कुंभार, बेबीताई लोहार, सेवा संस्थेचे अध्यक्ष पी. के. केसरकर, सदस्य मारुती देसाई, अशोक गुरव, संभाजी कांबळे, रत्नाबाई केसरकर, अर्जुन कुंभार, टी. ए. पाटील, सुनील मुळीक, शिवाजी कुंभार, हरिश्चंद्र डोंगरे, छबुताई कुंभार, संजय डोंगरे, प्रमोद घाटगे, शांताराम माने, बाळासाहेब दिेवेकर, शंकर गोरे, विष्णू मुळीक, सुधीर सुतार, सुधीर जाधव, दाजीबा देवरकर, विजय गाडे, संतोष सावंत आदी उपस्थित होते. संतराम कुंभार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67195 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top