
आ. ह. साळुंखे सत्कार
२८७०७
स्वातंत्र्य, समतेचा झेंडा तरुणाई पुढे नेईल
---
डॉ. आ. ह. साळुंखे; परिवर्तनवादी संघटनांतर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः ‘‘देशात निराशेचे वातावरण वाढत आहे, हे खरे असले तरी यापुढील काळात देशातील तरुणच स्वातंत्र्य, समतेचा झेंडा पुढे नेतील. अशी प्रतिभा मला तरुणांत दिसते आहे. सध्याच्या परिस्थिती चिंता व्यक्त करणारी आहे. देश वाचविण्यासाठी समाज तोडण्यापेक्षा समाजाला जोडण्याचे काम करावे, त्यासाठी तरुणांचा पुढाकार मोलाचा ठरेल,’’ असा सल्ला ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आज येथे दिला.
ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील विविध परिवर्तनवादी संघटनांतर्फे डॉ. आ. ह. साळुंखे यांचा शिक्षक आमदार कपिल पाटील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार झाला. तसेच, प्रा. प्रकाश गायकवाड लिखित ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ या डॉ. साळुंखे यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. या वेळी ते बोलत होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, ‘‘तोडणे खूप सोपे असते, जोडणे कठीण असते. वाळवीने पोखरलेला बांबू वाऱ्याच्या झुळकीत कोसळतो. तसे देशाला जोडण्यापेक्षा तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा वातावरणातून समाजाला, देशाला वाचविण्यासाठी विवेकवाद जागा ठेवावा लागेल. त्यातून समाज जोडला जाईल. प्रत्येक व्यक्तीची मूल्यांवरील निष्ठा बाह्य विचारांमुळे धूसर होत आहे. यात माणसं एकमेकांपासून दूर होत असताना समाज टिकणे मुश्कील होईल.’’
ते म्हणाले, ‘‘तोडणे खूप सोपे असते, जोडणे कठीण. वाळवीने पोखरलेला बांबू वाऱ्याच्या झुळकेनेही मोडून पडतो. आज देशाला जोडण्यापेक्षा तोडण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा वातावरणातून समाजाला, देशाला वाचविण्यासाठी विवेकवाद जागा ठेवावा लागेल. त्यातून देश जोडण्याचे काम होईल. प्रत्येक माणसाची मूल्यांवरील निष्ठा बाह्य विचारांमुळे धूसर होत आहे. यात माणसं एकमेकांपासून दूर होत असताना समाज टिकणे मुश्कील होईल, ही बाब गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.’’
या वेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शाहीर संभाजी भगत यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. प्रा. अमर कांबळे, प्रा. अमर पांगे, लोकायत प्रकाशनचे राकेश साळुंखे, अमित मेधावी आदी उपस्थित होते.
कोल्हापूरविषयी कृतज्ञता
‘‘जगभर जेवढी व्याख्याने दिली नसतील, तेवढी व्याख्याने मी कोल्हापुरात दिली. याच शाहू स्मारक भवनातून मी वैचारिक बीजे व्याख्यानातून रोवू शकलो, याचा मला अभिमान आहे. त्यामुळे येथे येताना मला नेहमी घरात आल्याचा आनंद होतो,’’ अशा शब्दांत डॉ. साळुंखे यांनी कोल्हापूरविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
इतिहास बदलाच्या प्रयत्नावर बोट
आमदार कपिल पाटील म्हणाले, ‘‘महात्मा फुलेंनी सुरू केलेली धर्म चिकित्सा त्याच नेटाने डॉ. साळुंखे यांनी पुढे नेली. त्यांच्यामुळे बहुजनांना खरा इतिहास समजला; पण अजूनही मानसिक गुलामगिरीतून समाज मुक्त झालेला नाही. आज इतिहास बदलण्याचे सतत प्रयत्न होतात. हे पाहता येत्या काळात देशाचे राष्ट्रपिता बदलून दुसराच इतिहास पुस्तकातून शिकवला जातो की काय, अशी शंका ठळक होत आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67334 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..