धनंजय महाडिक विजयी मिरवणूक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय महाडिक विजयी मिरवणूक बातमी
धनंजय महाडिक विजयी मिरवणूक बातमी

धनंजय महाडिक विजयी मिरवणूक बातमी

sakal_logo
By

28745 शड्डू २ कॉलम

28752 पाच कॉलम

जल्लोषी मिरवणुकीने महाडिकांचे शक्तिप्रदर्शन
हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग; जेसीबीमधून गुलालाची उधळण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि बेभान होऊन नाचणारी तरुणाई अशा विजयी जल्लोषी मिरवणुकीने नूतन खासदार धनंजय महाडिकांचे स्वागत आज करण्यात आले. अडीच वर्षे सुप्तावस्थेत गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने एकत्र येऊन जल्लोष केला. खासदार महाडिक यांनीही शक्तिप्रदर्शन करून जिल्ह्याच्या राजकारणाने एक वेगळे वळण घेतल्याचे दाखवून दिले. कावळा नाका ते छत्रपती शिवाजी चौक या मार्गावर ही मिरवणूक निघाली.
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. अशक्यप्राय वाटणारी ही निवडणूक भाजपने जिंकली आणि महाडिक पुन्हा एकदा खासदार झाले. कावळा नाका येथे संध्याकाळी ५ वाजता कार्यकर्ते एकत्र आले. कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे नाचवत डॉल्बीच्या ठेक्यावर ताल धरला. यावेळी जेसीबीमधून गुलालाची उधळण केली. पाहाता पाहता संपूर्ण चौक कार्यकर्त्यांनी भरून गेला. ५.३० वाजण्याच्या सुमारास खासदार महाडिक आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे आले. यावेळी या तिघांना बुममध्ये उभा करून फुलांचा २५ फुटी हार क्रेनच्या सहाय्याने घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी महाडिक आणि पक्षाच्या विजयाच्या घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. कावळा नाका, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मिरवणूक आली. दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला महाडिक यांनी अभिवादन केले. त्यानंतर बिंदू चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मिरवणुकीत कार्यकर्ते दुचाकीवरून सहभागी झाले होते. यावेळी मशिनच्या माध्यमातून गुलाल उधळला जात होता. मिरवणुकीत संपूर्ण महाडिक कुटुंब सहभागी झाले होते.
मिरवणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजयसिंह खाडे-पाटील, सुहास लटोरे, विजय सूर्यवंशी, किरण नकाते, महेश जाधव, गणेश देसाई आदी सहभागी झाले होते.


महाडिकांचा शड्डू अन्‌
कार्यकर्त्यांचा जल्लोष
विजयी मिरवणुकीत खासदार धनंजय महाडिक यांनी चौकाचौकात शड्डू ठोकून आपली विजयी भावना कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली. छत्रपती शिवाजी चौकात त्यांनी शड्डू मारून चांदीची गदा खांद्यावर घेतली. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

काँग्रेस कमिटी समोर फटाके
मिरवणुकीच्या मार्गात काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाजवळ आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी इथे फाटाक्यांच्या माळा लावल्या. गुलालाची उधळण केली. अखेर खासदार महाडिक यांनी कार्यकर्त्यांना पुढे जाण्याची सूचना केली.

जागोजागी स्वागत
मिरवणुकीच्या मार्गात खासदार महाडिक यांचे नागरिकांनी, विविध संस्था संघटनांनी जल्लोषी स्वागत केले. महिलांनी त्यांना ओवाळले. तर नागरिकांनी पुष्पहार घालून त्यांना शुभेच्छा दिल्या. बिंदू चौकात जिजाऊ फाउंडेशनचे सचिन तोडकर यांनी त्यांचे स्वागत केले. तर गुजरी कॉर्नर येथे सराफ संघाने महाडिक यांना शुभेच्छा दिल्या.
-----------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67338 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top