बालिंग्याजवळ अपघातात ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालिंग्याजवळ अपघातात ठार
बालिंग्याजवळ अपघातात ठार

बालिंग्याजवळ अपघातात ठार

sakal_logo
By

खासगी बसखाली सापडून
उजळाईवाडीतील तरुण ठार
---
संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड
बालिंगा, ता. १३ : फुलेवाडी-बालिंगा रस्त्यावर दुचाकी खड्ड्यात जाऊन घसरली आणि दुचाकीस्वार तोल जाऊन खासगी आराम बसखाली सापडून ठार झाला. कांतिलाल शिवराम राठोड (वय ३८, रा. शिवपार्वती नगर, उजळाईवाडी) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने खासगी आराम बसची तोडफोड केली. जमाव पाहून वाहनचालक तेथून पळून गेला. रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः उजळाईवाडी येथून काही तरुण राठोड यांच्याबरोबर येथील एका हॉटेलमध्ये जेवणास आले होते. जेवण झाल्यावर ते पुन्हा उजळाईवाडीला निघाले होते. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रात्रीच्या अंधारात हे खड्डे कोणाच्याही लक्षात येत नाहीत. असाच एक खड्डा चुकविताना राठोड यांची दुचाकी घसरली आणि ते तोल जाऊन पडले. त्याचवेळी गोव्याहून मुंबईकडे निघालेल्या आराम बसखाली ते सापडले. चालकाच्या लक्षात येण्याआधीच बस राठोड यांच्या अंगावरून गेली आणि राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याचे पाहताच रस्त्यावरून जाणाऱ्यांनी खासगी आराम बसवर दगडफेक करून तोडफोड केली. हे होत असतानाच बसचालकाने तेथून पळ काढला. त्यामुळे लोक अधिकच संतप्त झाले. अपघाताची माहिती समजताच करवीर पोलिस तत्काळ अपघातस्थळी पोचले आणि त्यांनी अपघाताची माहिती घेतली.
....
हकनाक बळी
फुलेवाडी ः बालिंगा- गगनबावडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मात्र, रस्ता अरुंद असल्याने रोज या ठिकाणी अपघात होत असतात. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. तसेच, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचीही मागणी सातत्याने होत असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या दुर्लक्षामुळेच तरुणाचा हकनाक बळी गेल्याची संतप्त प्रतिक्रिया घटनास्थळावर व्यक्त होत होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67346 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top