जपानमधील सिलोसियाचे दानोळीत उत्पादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जपानमधील सिलोसियाचे दानोळीत उत्पादन
जपानमधील सिलोसियाचे दानोळीत उत्पादन

जपानमधील सिलोसियाचे दानोळीत उत्पादन

sakal_logo
By

लोगो ः शेतीतील वेगळ्या वाटा - १
----------------
28767
-----------
जपानमधील सिलोसियाचे दानोळीत उत्पादन
शरद बिरनाळे यांचा प्रयोग : डेकोरेशन क्षेत्रात वेगळी बाजारपेठ निर्माण
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. १३ ः येथील शरद बिरनाळे प्रयोगशील शेतकरी डेकोरेशनसाठी उपयुक्त सिलोसिया या जास्तकाळ टिकणाऱ्या पिकाचे उत्पादन घेत आहेत. त्याची देशभरामध्ये डेकोरेशनसाठी मोठी मागणी आहे. त्यातून मिळणारे उत्पादनही इतर फुलशेतीच्या तुलनेत अधिक आहे. जपानमधील हे पीक दानोळी (ता. शिरोळ) येथे आणून त्याचे उत्पादन घेणारा हा शरद हा पहिला शेतकरी आहे.
सिलोसिया हे वेगवेगळ्या रंगामध्ये येणारे तुऱ्यासमान असे गार्डन व्हरायटीमधील पीक आहे. त्याचे जपानसह इतर देशात पीक घेतले जाते. त्याचा मावस भाऊ अजय धांदले हा मर्चंट नेव्हीत असून तो जपानमध्ये गेला. त्यावेळी त्याने सिलोसियाचे फोटो काढले होते. ते शरदने पाहून त्या पिकाची चौकशी करून त्याचा अभ्यास करून पुण्यातून हे बियाणे मिळवले.
बियाणासपासून रोपवाटिकेतून रोपे तयार केली. एक महिन्याने दहा रोपांचे गुडछडीच्या पिकात आंतरपीक म्हणून लागवड केली. लागवडीनंतर साठाव्या दिवसापासून त्याचे कटिंग करून उत्पादन सुरू होते. ते १०५ दिवसापर्यंत चालते. लाल, पिवळा, केसरी, फिक्कट गुलाबी, गडद गुलाबी अशा पाच रंगामध्ये शरद उत्पादन घेत आहेत.
देशातील मुंबई, बेंगलोर, हैद्राबाद, सूरत, अहमदाबाद, इंदोरमध्ये फुल व्यापाऱ्यांच्या माध्यमातून स्वत:ची बाजारपेठ निर्माण केली आहे. पाच काड्याला सुमारे ७० रुपये दर मिळत आहे. इतर डेकोरेशनची फुले ही तीन-चार दिवसांत खराब होतात. मात्र सिलोसिया हे दहा दिवसानंतरही ताजे रहाते. त्यामुळे बाजारपेठेत त्याला मागणी वाढत आहे.
------------
28766
नेहमी वेगळे काही करण्याचे उद्देशाने मी अथक प्रयत्नाने सिलोसियाचे उत्पादन घेत आहे. परंपरागत शेतीपेक्षा आधुनिक शेतीकडे तरुण शेतकऱ्यांनी वळावे, अशा उद्देशाने मी प्रयोग करत असतो. गुलछडी, जिरेनियनसोबत मी सिलोसियाचा यशस्वी प्रयोग केला आहे. उत्पादन व उत्पन्न चांगले मिळत आहे. डेकोरेशन क्षेत्रात आपल्या उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण करुन स्वतःची बाजारपेठ निर्माण करण्यात यश मिळत आहे.
-शरद बिरनाळे, दानोळी
-----------------
राज्यात हे नवीनच पिक आहे. इतर डेकोरेशनच्या तुलनेत सिलोसिया हे जास्तकाळ टिकणारे व वेगळेपण असल्याने त्याची मागणी वाढत आहे. त्याला दरही जास्त मिळत आहे.
-प्रशांत ठाकूर, मुंबई, रोहित पाटील-जयसिंगपूर, फूल व्यापारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67369 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top