रंकाळा तलावात जलपर्णी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंकाळा तलावात जलपर्णी
रंकाळा तलावात जलपर्णी

रंकाळा तलावात जलपर्णी

sakal_logo
By

28773

रंकाळ्याचा पूर्व भाग व्यापला जलपर्णीने
--
तलावाच्या आस्तित्वाला धोका; सुशोभीकरणाऐवजी ‘शुद्धीकरणाची गरज’


रंकाळा तलाव
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. १३ : काही वर्षांपूर्वी रंकाळा तलावाची अवस्था जलपर्णीमुळे मैदानाप्रमाणे झाली होती. त्यावेळी जलपर्णी काढण्यासाठी लोकआंदोलने झाली होती, कोट्यवधीचा निधी खर्च झाला होता. मात्र, आताही रंकाळ्याचा पूर्व भाग जलपर्णीने व्यापला आहे. ही जलपर्णी पूर्ण रंकाळ्यात पोहोचण्यापूर्वी काढून विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, अन्यथा रंकाळा तलावाचे अस्तित्व पुन्हा लयास जाणार आहे.
एकीकडे रंकाळा सुशोभीकरणासाठी शासनाकडून लाखोंचा निधी दिला जात आहे. सुशोभीकरण कसे होणार हा संशोधनाचा विषय आहे. परंतु, रंकाळ्यात येणारे सांडपाणी व नाल्याचे पाणी थांबवणे महापालिकेकडून अनेक वर्षांपासून झालेले नाही. आजही अनेक ठिकाणी नाले थेट रंकाळ्यात मिसळत आहेत. त्यामुळे रंकाळ्याचे पाणी काळे होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. पाण्यातील ऑक्सिजन कमी होणे, मासे, जलचर मरणे असे प्रकार अधून-मधून होतात. यावर उपाय म्हणून पाण्यात मोटरबोट फिरवणे हा पर्याय लोकप्रतिनिधीनींनी ‘शोधला’. यामुळे पर्यटकांना बोटिंगची सुविधा झाली असली तरी यामुळे रंकाळा किती स्वच्छ राहतो?, हे शोधण्यासाठी एक समिती नेमावी लागेल. ‘रंकाळा सुशोभीकरणाऐवजी’ ‘रंकाळा शुद्धीकरण’ मोहीम हाती घेणे गरजेचे.
जुन्या वाशी नाक्याकडून राजकपूर पुतळ्याकडे जाणारा पदपथ पुलाच्या पूर्व बाजूला जलपर्णी मोठ्या प्रमाणात साचली आहे. वाऱ्याने अथवा पक्ष्यांच्या पायामधून जर जलपर्णी तलावाच्या पाण्यापर्यंत पोहोचली तर पुन्हा रंकाळा जलपर्णीच्या व्यापून जाईल आणि मग रंकाळा वाचवण्यासाठी पुन्हा नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल. प्रशासनाने ही जलपर्णी कमी असतानाच काढली तर रंकाळ्याचे अस्तित्व किमान आहे या स्थितीत राहणार आहे, अन्यथा रंकाळ्याची खण किंवा आजच्या कोटीतीर्थ तलावासारखी होईल. काही दिवस जलपर्णीमुळे कोटीतीर्थ तलावाचे पाणी नजरेस पडत नाही आणि तलावातील जलपर्णी काढण्यासाठी महापालिका नाममात्र मोहीम राबवत आहे.

कोट
शहरातील अतिक्रमण दरदिवशी वाढताना दुर्लक्ष करायचे नंतर मोहीम दाखवून हे अतिक्रमण काढायचे नाटक करायचे. त्याचप्रमाणे रंकाळ्यात जलपर्णी कमी असताना न काढता टक्केवारीच्या अपेक्षेतून मोठा निधी खर्च दाखवण्यासाठीच लोकप्रतिनिधी आणि अधिकारी रंकाळा जलपर्णीने भरण्याची वाट पाहत आहेत, हे कोल्हापूरचे दुर्दैव आहे. जलपर्णी तातडीने काढली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील.
- अशोक देसाई, कार्यकर्ते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67372 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top