समाजवादी प्रबोधिनीतर्फे धोंडीलाल शिरगावे यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजवादी प्रबोधिनीतर्फे धोंडीलाल शिरगावे यांचा सत्कार
समाजवादी प्रबोधिनीतर्फे धोंडीलाल शिरगावे यांचा सत्कार

समाजवादी प्रबोधिनीतर्फे धोंडीलाल शिरगावे यांचा सत्कार

sakal_logo
By

28814
समाजवादी प्रबोधिनीतर्फे
धोंडिलाल शिरगावे यांचा सत्कार
इचलकरंजी : येथील धोंडिलाल शिरगावे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, वाचनालयाचे अध्यक्ष शशांक बावचकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. गेली पाच दशके शहराच्या राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात शिरगावे यांनी मोठे योगदान दिले आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलासह विविध पुरोगामी मंचांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. बाबूशेठ बागवान, प्रा. रमेश लवटे, डॉ. विलास जोशी, अहमद मुजावर आदी उपस्थित होते.
----------
28815
बालाजी विद्यालयाला रौप्यपदक
इचलकरंजी : बालाजी माध्यमिक विद्यालयाने विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त केले. आटपाडी (जि. सांगली) येथे निमंत्रित मुलांच्या १८ वर्षांखालील विभागस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत विद्यालयाने रौप्यपदक प्राप्त केले. संघात आदित्य करडे, प्रेम पवार, राम परीट, पवन कुदळे, समर्थ हेदूरे, संस्कार आरोटे, श्रेयस मुडसे, रोहित शेलार, अभिषेक शिंदे, समीर कंबोगी, ओम पोवार आदींचा सहभाग होता. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष मदन कारंडे यांच्या हस्ते सत्कार केला. विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव महेश कोळीकाल, मुख्याध्यापिक सौ. एम. एस. रावळ, उपमुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर, क्रीडा विभागप्रमुख राजेश चौगुले, उत्तम मेंगणे, रवी चौगुले आदींचे मार्गदर्शन लाभले.
---------
न्यू हायस्कूलचा निकाल १०० टक्के
इचलकरंजी : देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या दि न्यू हायस्कूलचा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेस २५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अ श्रेणीत ४, तर ब श्रेणीत ७ विद्यार्थी पात्र ठरले. यामध्ये पूजा सुतार, पायल ठाणेकर, वैष्णवी नाईक, राधीका माळी, गौरी जोशी, मुस्कान मुल्ला, श्‍वेता सुढाळ, साक्षी पागडे, चिन्मय भालेकर, सूरज वागरे, संदेश कुंभार आदींचा समावेश आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनी क श्रेणी प्राप्त केली. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस. ए. पाटील, कलाशिक्षक पी. एस. कोळेकर, पर्यवेक्षक डी. ए. तराळ, बी. ए. कोळी आदींचे मार्गदर्शन लाभले.
----------
‘रोटरी’तर्फे हृदयरोग निदान शिबिर
इचलकरंजी : रोटरी क्लब ऑफ सेंट्रलतर्फे मोफत हृदयरोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. आई फाउंडेशन व स्वस्तिक हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. शिबिरात मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरातील पात्र रुग्णांची शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात आवश्‍यकतेनुसार मोफत ईसीजी काढण्याची सोय केली आहे. शिबिर शनिवारी (ता. १८) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत नाकोडानगर, दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र येथे होणार आहे. रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.
----------
दिव्यांगांसाठी शाळाप्रवेश सुरू
इचलकरंजी : तिळवणी (ता. हातकणंगले) येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ स्कूलमध्ये दिव्यांगांसाठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वप्राथमिक पहिलीपासून ते सातवीपर्यंत प्रवेश सुरू आहेत. दिव्यांगांना शिक्षणासह विविध प्रकारचे व्यवसाय शिक्षणही दिले जाते. विद्यार्थ्यांना व्यवसायासंबंधी कला, हस्तव्यवसाय याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते. दिव्यांग मुलांनी शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन मुख्याध्यापिका स्कमिता रणदिवे यांनी केले आहे.
----------
‘देशी झाडे जमा करावीत’
इचलकरंजी : झाडांची भिशी ग्रुपच्या माध्यमातून शहर व परिसरात सामाजिक वनीकरण तयार केले जाणार आहे. यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरात आलेली लहान पिंपळ, वड, चिंच, उंबर यासारखे देशी वृक्ष पिशवीमध्ये लावून घ्यावेत. ही रोपे ‘झाडांची भिशी ग्रुप’कडे सुपूर्द करावीत. जेणेकरून परिसरात वाढत असलेली ही देशी झाडे अन्य ठिकाणी उत्तम प्रकारे वाढवता येतील, अशी झाडे नागरिकांना जमा करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67410 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top