गडहिंग्लजच्या विकासरथाचे सारथी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजच्या विकासरथाचे सारथी
गडहिंग्लजच्या विकासरथाचे सारथी

गडहिंग्लजच्या विकासरथाचे सारथी

sakal_logo
By

पुरवणीचे डोके ः आमदार राजेश पाटील वाढदिवस विशेष
------------------------------
gad135.jpg :
आमदार राजेश पाटील
----------------------------------------
गडहिंग्लजच्या विकासरथाचे सारथी

चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी गडहिंग्लज तालुक्याच्या विकासासाठी १२५ कोटींचा निधी खेचून आणत तालुक्याच्या विकासरथाचे सारथी बनले आहेत. तीन वर्षांच्या कारकिर्दीत दोन वर्षे कोरोनाचा कालावधी असूनही केवळ मतदारसंघाचा सर्वांगीण विकासाचे ध्येय नजरेसमोर ठेवून आमदार पाटील यांची वाटचाल राहिली आहे. निवडणुकीत केवळ मतदान दिलेलीच गावे नव्हे तर कमी मतदानाच्या गावातही जाऊन विकासकामे पोहोचवण्याची त्यांची मनापासूनची भावना जनमाणसावर ठसा उमटवत आहे. यामुळेच अल्प कालावधीत जनतेने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले आहे.
जनतेने संधी दिल्यापासूनच आमदार पाटील यांनी पायाला भिंगरी बांधल्यासारखे मतदारसंघ पिंजून काढला आहे. विकासासाठी केवळ मोठी गावे नजरेसमोर न ठेवता वाड्या-वस्त्यांवरही त्यांनी विकासगंगा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. गावागावांतील अंतर्गत रस्त्यासाठी सुमारे २० कोटींचा निधी आणण्यात त्यांना यश मिळाले. हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपणी नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्‍यातील पाण्याचा अधिकाधिक लाभ मिळावा म्हणून प्रत्येक बंधाऱ्‍याच्या दुरुस्तीसाठी निधी आणला. बटकणंगले-मांगनूर सावतवाडी या महत्त्‍वाकांक्षी रस्त्यासाठी दहा कोटी उपलब्ध करून दिले. खासदार संजय मंडलिक यांच्याकडे पाठपुरावा करून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून २० कोटींचा निधी खेचून आणला.
कोरोना कालावधीत निधी मिळविण्यासाठी संघर्ष असतानाही १० कोटींची विकासकामे त्यांनी केली आहेत. कोरोना महामारीत रुग्णांच्या वाहतुकीची गरज लक्षात घेऊन त्यांनी उपजिल्हा रुग्णालयासह बहुतेक सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवी रुग्णवाहिका देण्याच्या संकल्पाची पूर्ती केली. या प्रमुख कामासह शाळा, पाणी योजना, सर्व प्रमुख रस्ते, आरोग्य आदी क्षेत्रांना विकासाचा नवा आयाम आमदार पाटील यांनी दिला. जनतेने दिलेल्या संधीची पोहोच पावती विकासाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला आहे. म्हणूनच त्यांना अल्पावधीतच लोकनेत्याची बिरुदावली जनतेने प्रदान केली आहे.
---------------------------

* ‘उचंगी’ची संकल्प पूर्ती
आमदार पाटील सर्वांना सोबत घेऊन विकासाची पालखी पुढे नेत आहेत. आजरा व गडहिंग्लज तालुक्यासाठी वरदायी असणारा उचंगी प्रकल्पात यंदा पाणीसाठ्याचा संकल्प आमदार पाटील यांनी केला होता. या प्रकल्पाची घळभरणी आता अंतिम टप्प्यात आली असून या पावसाळ्यात प्रकल्पात पाणीसाठा होणार आहे. सततच्या पाठपुराव्याद्वारे हा संकल्पही ते पूर्ण करणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67426 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top