
पोलिस वृत्त
अपघातात
तरुण जखमी
कोल्हापूर ः दाभोळकर कॉर्नर परिसरात झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. किरण अनिल साठे (वय २५, रा. रुकडी, हातकणंगले) असे जखमींचे नाव आहे. त्यांना सीपीआरध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
पोलिस कर्मचाऱ्याची
बिघडली प्रकृती
कोल्हापूर ः कर्तव्य बजावणाऱ्या करवीर पोलिस ठाण्यातील चालक पोलिस कर्मचाऱ्यास अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तत्काळ सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. सुनील बंडोपंत देसाई (वय ४८) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
भाजून महिला जखमी
कोल्हापूर ः स्वयंपाक करीत असताना काल रात्री महिला भाजून जखमी झाली. त्यांना गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मनीषा आडसुळे असे त्यांचे नाव आहे. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
संशयितावर गुन्हा
कोल्हापूर ःमोबाईल संच चोरीच्या संशयावरून शाहूपुरी पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. प्रदीपकुमार कोळी असे त्या संशयिताचे नाव आहे. ही कारवाई मध्यवर्ती बस स्थानकातील स्वच्छतागृहाजवळ काल सायंकाळी केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67493 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..