गौन खनिज धारकांचा डंपर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौन खनिज धारकांचा डंपर मोर्चा
गौन खनिज धारकांचा डंपर मोर्चा

गौन खनिज धारकांचा डंपर मोर्चा

sakal_logo
By

२८८६०
डंपरसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
खाणकाम सुरू करण्याची मागणी; बंद खाणकाम सुरू न केल्यास डंपरसह मंत्रालयावर धडकेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः गौण खनिजासाठी बंद केलेले खाणकाम सुरू करा यांसह वडार समाज, मजूर, डंपर मालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर डंपरसह धडक मारण्याचा खणखणीत इशारा आज राज्य गौण खनिज क्रशर, वडार, मजूर व डंपर मालक व्यावसायिक कृती समितीने दिला आहे. सुमारे तीनशेवर डंपर आणि सुमारे दोन हजार मजूर, डंपर मालकांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर चालून आले. मात्र चक्का जाम होण्याच्या शक्यतेने पोलिस निरीक्षक ईश्‍वर ओमासे यांनी शिरोली नाका परिसरातच डंपर रोखले. प्रातिनिधिक पाच डंपरसह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन दिल्यानंतर दहा दिवसांत त्यांनी खाणकामांसाठी सहकार्य केले नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. राज्यातील हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नागरिकांपासून ते शासनस्तरावर विकासकामे बंद पडली आहेत. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या हितासाठी व आमच्यासाठी तात्पुरता मार्ग काढून व्यवसास सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी ही मागणी केली.
मोर्चात सुमारे दोन हजार मजूर, डंपर मालक, वडार समाजाचे प्रमुखांचा समावेश होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर सुमारे तासभर तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. जिल्हाधिकारी रेखावार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनी मागण्यांचे निवेदन मंत्रालयस्तरावर पाठवित असल्याचे सांगितले.
दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनीही जिल्हाधिकारी रेखावार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. क्रशर असोसिएशन अध्यक्ष पप्पू पाटील, सखाराम वडर, नागेश वडर (जयसिंगपूर), शिये क्रशर असोसिएशन अध्यक्ष मोहन पाटील, टोप क्रशर असोसिएशन अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन अध्यक्ष मिलिंद साखरपे (जयसिंगपूर), अर्थमुव्हिंग मशिनरी असोसिएशन अध्यक्ष रवी (बापू) पाटील, न्यू अर्थमुव्हिंग मशिनरी असोसिएशन अध्यक्ष संजय चौगुले, नरसिंह स्टोन क्रशर असोसिएशन अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

मागण्या
पर्यावरणची अट किंवा इतर अटी शिथिल कराव्यात
गौण खनिज उत्खननाच्या जाचक अटी शिथिल कराव्यात
जेसीबी, पोकलॅन्ड, डंपर, ट्रॅक्टरवरील दंडाची रक्कम कमी करावी
वडार समाजासाठी २०० ब्रास रॉयल्टी माफ असून ती ५०० ब्रास करावी
गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर जीपीएस प्रणाली नको.
शासन रॉयल्टी सद्यःस्थितीला ३ ठिकाणी भरून घेते ती एकाच ठिकाणी घ्यावी
महिलांसाठी हातफोडी खडी फोडणेसाठी तालुकानिहाय शासनाने सेंटर चालू करावे

कोट
दगड उत्खननामुळे बांधकाम, क्रशर व्यावसायिक, सामान्य नागरिकांपासून ते बिल्डरपर्यंत तसेच शासनाचे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर, खासगी कॉन्ट्रॅक्टर, सामान्य गवंडी, सेंट्रिग कामगार व डंपर मालक, कामगार यांचा उदरनिर्वाह बंद झाला आहे. त्यामुळे पोटतिडकिने येथे आलो आहे. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर डंपरसह मोर्चा काढणार आहे.
शिवाजी पोवार, राज्य उपाध्यक्ष, वडार मालक संघ

कोट
तुमच्या कष्टामुळेच आज इमारती, रस्ते दिसतात. काही ठिकाणी काम चालू केले आहे, जेथे खाणी सील आहेत त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. योग्य तो मार्ग काढू असे त्यांनी सांगितले आहे. तुमच्या मागण्या जिल्ह्यापुरत्या मर्यादित नाहीत. त्यामुळे उद्याच मुंबईत मंत्र्यांशी शिष्टमंडळासोबत भेट घेणार आहे.
धैर्यशील माने, खासदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67494 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top