न्यायालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायालय
न्यायालय

न्यायालय

sakal_logo
By

२८९१८

शाहूंच्या न्यायनगरीत काम करणे भाग्याचे
श्रीमती वृषाली जोशी; बार असोसिएशनतर्फे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांना शुभेच्छा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः छत्रपती शाहूंच्या न्यायनगरीत न्यायदानाचे काम करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्यच असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वृषाली जोशी यांनी व्यक्त केले. जिल्हा बार असोसिएशनतर्फे नवीन पदभार स्वीकारलेल्या न्यायाधीशांचा सत्कार केला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जोशी यांची मुंबई येथे बदली झाल्याने त्यांनाही शुभेच्छा दिल्या.
जिल्हा न्यायालयात पदभार स्वीकारलेल्या न्यायाधीशसो श्रीमती पी. एफ. सय्यद, एस. एम. तांबे, एच. ए. मुल्ला, एस. एस. जगताप, जे. एम. पांचाळ, के. आर. सिंघेल, एम. जी. मस्के, एम. एम. पळसापुरे, एस. एस. तट, श्रीमती एस. डी. कांबळे, श्रीमती एल. पी. जाधव यांचा ज्येष्ठ विधिज्ञ यांच्या हस्ते सत्कार झाला.
जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके यांनी करवीरनगरी ही न्यायभूमी आहे. येथे न्यायदान करण्यास मिळणे हे मोठे भाग्य आहे. बार बेंचमध्ये समन्वय असल्यास चांगले न्यायदान होते असे सांगितले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड. विवेक घाटगे, ज्‍येष्ठ वकील के. ए. कापसे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. प्रकाश मोरे, ॲड. संपतराव पवार, यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव अडगुळे, असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. अशोक पाटील, ॲड. दीपक पाटील, सहसचिव संदीप चौगले, ॲड. तृप्ती नलवडे, ॲड. संकेत सावर्डेकर, ॲड. सुशांत चेंडके, ॲड. करण पाटील तसेच ज्‍येष्ठ वकील सभासद उपस्थित होते. सचिव ॲड. विजयकुमार ताटे देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67522 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top