
इन्व्हेस्टर असोसिएशनतर्फे चर्चासत्र
28917
कोल्हापूर : कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनतर्फे चर्चासत्र प्रसंगी उपस्थित अनिल रंगवाणी. डावीकडून अजित गुंदेशा, विपीन दावडा, प्रविण ओसवाल, संदीप अथणे.
सोने खरेदी-विक्रीचे व्यवहार
गोल्ड रिसीटव्दारे करा ; रंगवाणी
--
कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनतर्फे चर्चासत्र
कोल्हापूर, ता. १३ : ‘‘गुंतवणूकदारांकडे भैतिक स्वरुपात असणारे सोने सुरक्षितरित्या ठेवणे, त्याचे डी-मॅट स्वरुपात इलेक्टॉनिक गोल्ड रिसीटद्वारे सुरक्षीत आणि खात्रीशीर खरेदी-विक्रीचे व्यवहार स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून करता येणार आहे,’’ असे मत स्टॉक एक्स्चेंज मुंबईचे प्रॉडक्ट व्यवस्थापक अनिल रंगवाणी यांनी केले. कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन आणि बीएसई-आयपीएफतर्फे ‘बीएसई (ईजीआर) इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट ॲन्ड गोल्ड ऑप्शन’ यावर चर्चासत्र झाले.
श्री. रंगवाणी म्हणाले, ‘‘ईजीआर म्हणजेच इलेक्टॉनिक गोल्ड रिसीट हे डिमटरेयाईज्ड स्वरुपात सोन्याचे व्यवहार करण्याचा डिजीटल मार्ग असून आता गुंतवणूकदारांना सोने स्टॉक एक्स्चेंजच्या प्लॅटफॉर्मवरुन खरेदी-विकले केले जाऊ शकते. ईजीआर म्हणजेच इलेक्टॉनिक गोल्ड रिसीट एक उत्पादन म्हणून गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील असणारे सोने डिजीटलमध्ये सुरक्षीत तर रहाणार; पण त्यावर त्यांचा फायदासुध्दा होणार आहे. ज्यावेळी पारंपरिक पध्दतीने सोने खरेदी-विक्री केली जाते. हे सोने आपल्याकडे ठेवले जाते. हे सोने स्वत:जवळ ठेवणे खूप आव्हानात्मक असते. त्याचा खरेदी-विक्री करताना अनेक समस्या, आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यांनी सर्व माहितीसह स्लाईड-शोद्वारे अनेक उदाहणासह स्पष्ट केल्या. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. सचिव अजित गुंदेशा यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष प्रविण ओसवाल यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष विपीन दावडा यांनी परिचय करुन दिला. सहसचिव संदीप अथणे यांनी आभार मानले. असोसिएशनचे संचालक अजित वणकुद्रे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67530 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..