अडीच वर्षात काय केलं हे जाहीर करा ः महाडिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अडीच वर्षात काय केलं हे जाहीर करा ः महाडिक
अडीच वर्षात काय केलं हे जाहीर करा ः महाडिक

अडीच वर्षात काय केलं हे जाहीर करा ः महाडिक

sakal_logo
By

अडीच वर्षांत काय केलं ते जाहीर कराच
खासदार धनंजय महाडिक; खासदार संजय मंडलिक यांना प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः खासदार संजय मंडलिक यांनी अडीच वर्षात केलेली कामे जाहीर करावीत. म्हणजे मी त्यात हस्तक्षेप करणार नाही. मुळात २०१४ ते १९ या काळात मी जी कामे केली तेथे जाऊन फक्त फोटो काढण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही, असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी खासदार संजय मंडलिक यांना आज पत्रकार परिषदेत लगावला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. या वेळी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये खासदार महाडिक यांचाही सहभाग होता. ‘खासदार झाल्यावर आता आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नका,’ असे विधान संजय मंडलिक यांनी केले होते. याबाबत महाडिक म्हणाले, ‘‘मी २०१४ ते १९ खासदार होतो. त्यावेळी विरोधी पक्षातील खासदार असूनही जिल्ह्यात अनेक विकासकामांची सुरुवात केली. कारण केंद्रातील सरकारने कधी द्वेषाचे राजकारण केले नाही. विविध प्रश्नांची चांगली मांडणी केली, प्रश्नोत्तरात सहभाग घेतला. त्यामुळे केंद्रा सरकारमधील मंत्र्यांनी मी सादर केलेले प्रस्ताव मंजूर केले. त्यामुळेच उडाण योजनेतून कोल्हापूर विमानतळाचा विकास झाला. त्यावेळी तीन विमाने येत होती आता एकच विमान येते. मी खासदार असताना रेल्वेस्टेशनचे सुशोभीकरण केले. सात नव्या रेल्वे सुरू केल्या. त्यतील काही रेल्वे आता बंद झाल्या. रेल्वेस्टेशनवरील एक्सलेटरही (सरकता जिना) आता बंद आहे. पासपोर्ट कार्यालय सुरू केले. ईएसआय रुग्णालय बंद होते ते सुरू केले. मंडलिकांनी केवळ या ठिकाणी जाऊन फोटो काढण्याचे काम केले. दुसऱ्याने केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन फोटो काढण्याची मला सवय नाही. त्यामुळे एकदा मंडलिकांनी अडीच वर्षात काय काम केले हे जाहीर करावेच.’’
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रकाश आवाडे, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे हे उपस्थित होते.

बास्केट ब्रीजला मान्यता
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘बास्केट ब्रिज ही संकल्पना मी मांडली होती. त्यावेळी त्याची चेष्टा केली गेली; पण त्याला आवश्यक असणाऱ्या सर्व मंजुरी झाल्या होत्या. निविदा पण निघाली होती. हा ब्रीज झाला असता तर महापुराच्या काळात कोल्हापुरात येणारी वाहतूक ठप्प झाली नसती.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67560 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top