एक्झॉटीक भाजीपाल्यातून फायदेशीर शेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक्झॉटीक भाजीपाल्यातून फायदेशीर शेती
एक्झॉटीक भाजीपाल्यातून फायदेशीर शेती

एक्झॉटीक भाजीपाल्यातून फायदेशीर शेती

sakal_logo
By

लोगो ः शेतीतील वेगळ्या वाटा (टुडे १ वरून घेणे)

29004
------------
एक्झॉटिक भाजीपाल्यातून फायदेशीर शेती
दानोळीतील अमित, राहुल दळवी बंधूंचे वेगळेपण; मेट्रोसिटीत मोठी मागणी

युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. १४ ः येथील अमित व राहुल दळवी या भावांनी शेतीत नवनवीन एक्झॉटिक भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन तोट्याची शेती फायदेशीर केली आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन त्यांनी आठ ते दहा प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एवढ्या विविध प्रकारच्या भाज्या एकत्रित उत्पादन घेण्याचे वेगळेपण त्यांनी तरुण शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे.
अल्प शेती असतानाही अठरा वर्षांपूर्वी वडील बापूसाहेब दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली बेबीकॉर्नचे उत्पादन व त्यानंतर कर्नाटकासह परिसरातील बेबीकॉर्न ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर अनेक वर्षांतील बाजारपेठेचा अंदाज घेऊन नवनवीन वेगळ्या व विदेशी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
सात महिन्यांपूर्वी त्यांनी डोंगराच्या पायथ्याची साडेसहा एकर शेती तयार करून तेथे आधुनिक पद्धतीने आठ ते दहा वेगवेगळ्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. ते लाल कोबी, चायना कोबी, चेरी टोमॅटो, आईस बर्ग, पिवळी व हिरवी झुकणी (इंग्लिश काकडी), ब्रोकोली (हिरवे फ्लॉवर), पॉकचाय अशा पालेभाज्यांचे उत्पादन घेत आहेत. त्यांचा पंचतारांकित हॉटेलमध्ये जास्त प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे त्याची मागणी मुंबई, गोवा, हैदराबाद, दिल्ली, बेंगलोर येथे आहे. तुलनेने कमी असली तरी स्थानिक बाजारपेठही निर्माण होत आहे. दळवी बंधू भाजीपाल्याचे फक्त उत्पादन न घेता मागणीनुसार त्याचे पॅकेजिंगही करून देत आहेत. साधारणातः इतर भाजीपाल्याला व या भाज्यांना उत्पादन खर्च तेवढाच येतो. मात्र, इतर भाजीपाल्याला दहा किलोस दर ठरतो आणि मिळतो; पण या भाज्यांना किलोस तेवढा दर मिळतो. त्यामुळे उत्पन्न जास्त मिळते.
----------------
29002
अनेक वर्षांपासून भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहोत. मार्केटमध्ये एक भाजी घेऊन जाण्यापेक्षा विविध दहा वेगवेगळ्या भाज्या घेऊन गेल्यास मोठा फायदा होतो. मेट्रोसिटीमध्ये अशा भाज्यांना व विदेशी खाद्यपदार्थामध्ये या भाज्यांची मोठी मागणी आहे. बाजारपेठेची नस ओळखून आम्ही उत्पादन घेत आहोत. त्यामुळे शेती फायद्याची ठरू लागली आहे.
- अमित दळवी, दानोळी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67655 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top