केशवराव भोसले नाट्यगृहाचे सीसीटीव्ही बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केशवराव भोसले नाट्यगृहाचे सीसीटीव्ही बंद
केशवराव भोसले नाट्यगृहाचे सीसीटीव्ही बंद

केशवराव भोसले नाट्यगृहाचे सीसीटीव्ही बंद

sakal_logo
By

29232
29188

‘केशवराव’मधील सीसीटीव्ही बंद
---
१६ कॅमेऱ्यांचा केवळ दिखावाच; यंत्रणा झाली कालबाह्य
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत नाटके, विविध सभा, बैठका, प्रशिक्षण, जाहीर कार्यक्रम होत असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद आहे. १६ कॅमेरे, त्यासाठीची यंत्रणा कालबाह्य झाल्याने त्याची दुरुस्तीही नाही. नाट्यगृहात एखादी घटना घडल्यावरच या यंत्रणेचे महत्त्व समजणार आहे.
नाट्यगृहाचे नूतनीकरण झाल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे व त्याची यंत्रणा बसवली. सुरक्षेच्या विचारातून बसवलेली यंत्रणा बंद-सुरू अशा अवस्थेत होती. एचडी कॅमेरे असलेली ही यंत्रणा आता बंदच आहे. नुकतीच महापालिकेची आरक्षण सोडत झाली. त्या वेळी ही यंत्रणा बंद होती. ही यंत्रणा सुरू असती तर त्याचे रेकॉर्ड महापालिकेकडे राहिले असते. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवावी लागली. यांसारख्या अनेक कार्यक्रमांवेळी सीसीटीव्हीचे महत्त्व समोर येते. आयोजकही याबाबत विचारणा करतात. पण, महापालिकेकडून ही यंत्रणा बंद असल्याचे सांगितले जाते.
नाट्यगृह, स्टेज, पॅसेज, गॅलरी, कलादालन येथे बसवलेले कॅमेरे २००९ मध्ये सुरू झालेल्या एचडी प्रकारचे आहेत. आता ती यंत्रणाच कालबाह्य झाली आहे. त्यामुळे तांत्रिक प्रश्‍न तर होतात, शिवाय त्याचे सुटे भाग मिळत नसल्याने दुरुस्तीही होत नाही. यामुळे बिनकामाचे कॅमेरे आहेत. नाट्यगृहाचे नूतनीकरण केल्यावर त्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही व्यवस्था गरजेची आहे. या परिसरात महापालिकेचे ‘वॉचमन’ असले, तरी रात्री परिसराचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते.
-
महापालिकेची अनास्था
गुन्हेगारी वा अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यास प्रोत्साहन देत आहेत. अगदी दुकानांत तसेच तिथून बाहेरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठीही कॅमेरे बसविले जातात. शहराचा जास्तीत जास्त भाग तसेच उपनगराचा भाग सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा स्थितीत मोठ्या नाट्यगृहाच्या आवारात तसेच गेटवरील कॅमेऱ्यांबाबत महापालिकेची अनास्था आहे.

कलाकारांची वेगळीच मागणी
नाटकाचे रेकॉर्डिंग होण्याच्या भीतीने कलाकारांचा सीसीटीव्हीला आक्षेप असतो. त्यांच्याकडून सीसीटीव्ही बंद करण्यास सांगितल्यास सारी यंत्रणा बंद ठेवावी लागते. त्यामुळे इतर ठिकाणी काही घडल्यास ते सीसीटीव्हीत येत नाही. यापुढे नवीन यंत्रणा बसविताना याचा विचार करावा लागणार आहे. स्टेजवरील कॅमेरे आवश्‍यकता असल्यास बंद ठेवण्याची व्यवस्था करावी लागेल.

कोट
याबाबत नवीन कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याची मंजुरी झाल्यावर टेंडर प्रक्रिया राबवून अत्याधुनिक कॅमेरे असलेली यंत्रणा बसवली जाणार आहे.
- यशपाल राजपूत, सिस्टिम मॅनेजर, महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67664 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top