
जिल्हा परिषद मतदारसंघांवर वर्चस्व मिळवूया
29100
----------------------------
जिल्हा परिषद मतदारसंघांवर वर्चस्व मिळवूया
भिकू गावडे; आमदार राजेश पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १४ ः चंदगड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील सर्व दहा जिल्हा परिषद मतदारसंघांवर आगामी निवडणुकीत वर्चस्व स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे यांनी केले. हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते. तुलसी बझारच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
प्रारंभी गावडे, शिवानंद हुंबरवाडी, अलीसो मुल्ला, परसू पाटील आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून व पुष्पगुच्छ देऊन आमदार पाटील यांचे अभीष्टचिंतन केले. हुंबरवाडी म्हणाले, ‘आमदार पाटील यांनी अल्पावधीत मतदारसंघात सुमारे तीनशे कोटींची विकासकामे केली आहेत.’ एस. एल. पाटील म्हणाले, ‘आमदार पाटील यांनी वाडीवस्तीवर विकासकामे पोहोचवण्यात यश मिळवले आहे.’ पतसंस्था फेडरेशनतर्फे शांताराम भिंगुडे, शांताराम हजगुळकर, कन्हैय्या कुलकर्णी, रवींद्र जांभळे यांनीही शुभेच्छा दिल्या. आमदार पाटील म्हणाले, ‘माझ्या विजयासाठी समाजातील अनेक लहान-मोठ्या घटकांनी कष्ट घेतले. त्या सर्वांची मला जाण आहे. मतदारसंघाच्या विकासासंदर्भात जनतेने माझ्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.’ तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, शेती आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आमदार पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
तालुका कृषी विभागातर्फे शिरगाव येथील कार्यालयात आमदार पाटील यांना शुभेच्छा दिल्या. तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप यांनी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर केक कापून शुभेच्छा दिल्या. मांडेदुर्ग येथे आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भरमाणा पवार, संभाजी चोथे, उपसरपंच गणपत पवार, तलाठी इरगोंडा पाटील, सुनील पाटील आदींच्या हस्ते वृक्षारोपण केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67758 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..