वटपोर्णिमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वटपोर्णिमा
वटपोर्णिमा

वटपोर्णिमा

sakal_logo
By

फोटो बी. डी. चेचर

पर्यावरणाचा जागर करत वटपौर्णिमा
----------------------------------
विविध उपक्रम; पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांची प्रार्थना

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः पती-पत्नीच्या नात्यांची वीण अधिक घट्ट करणारी वटपौर्णिमा पर्यावरणपूरक उपक्रमांनी साजरी झाली. वडाचे पूजन, सणाच्या नावाखाली फांद्यांची होणारी तोड रोखत प्रत्यक्ष वडाचे रोप लावून काठापदराच्या साड्या, गजरा, सौभाग्यालंकारांचा साज लेवून महिलांनी निसर्गापुढे पतीच्या दीर्घायुष्याची व साताजन्माच्या सोबतीची कामना केली. शहरातील अंबाबाई मंदिरासह विविध मंदिर परिसरात असणाऱ्या वडाचे तसेच कुंडीतील वडाच्या रोपाचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, पोलिस, नर्सेस अशा ड्युटीवर असणाऱ्या महिला वर्गानेही कामाच्या ठिकाणीच वडाचे पूजन केले.
पावसाच्या आगमनाची चाहूल देणारी वटपौर्णिमा म्हणजे निसर्गाप्रतीची आदराची भावना. सावित्रीने यमाच्या तावडीतून पतीचे प्राण आणले ही पौराणिक कथा या दिवसाला जोडलेली असली तरी त्यातून वडाच्या झाडाचे असलेले औषधी महत्त्व आणि निसर्गाचे रक्षण अधोरेखित केले आहे. सकाळपासूनच पेठा, गल्ली, कॉलन्यांतून महिला घराबाहेर पडल्या. रस्त्यांवर हातात पूजेचे ताट घेऊन सजून निघालेल्या महिला दिसत होत्या. दिवसभर अंबाबाई मंदिर परिसरातील रामाचा पार येथे महिलांची गर्दी झाली होती. नवविवाहिता या पहिल्याच सणाबद्दल अधिक उत्सुक होत्या. अंबाबाई मंदिरात नवविवाहितांसाठी विशेष पूजेची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
-----------
प्लास्टिकमुक्तीची मोहीम
वटपौर्णिमेच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर अर्थ वॉरियर्सतर्फे वेगळा उपक्रम राबविला. प्लास्टिकमुक्तीची मोहीम राबवत महिलांना नको असलेली व सुस्थितीत असलेली साडी व ५१ रुपये देण्याचे आवाहन केले होते. याला महिलांचा प्रतिसाद मिळाला. शहरातील २३ ठिकाणी असलेल्या केंद्रावर महिलांनी साड्या जमा केल्या. जमा झालेल्या साड्यांच्या पिशव्या शिवून त्या विक्रेत्यांना दिल्या जाणार असल्याची माहिती कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्या तृप्ती देशपांडे यांनी दिली. यापुढेही ही मोहीम सुरू राहणार असून आशिष कोंगळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अर्थ वॉरियर्सतर्फे केले आहे.
------------
विधवा महिलांच्या हस्ते वडपूजन
विधवा महिलांना सण - समारंभात

आज कर्नाटकी बेंदूर
कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेले कर्नाटकी बेंदूर बुधवारी (ता. १५) साजरा होत आहे. घरोघरी पूजेसाठी मातीच्या बैलांची विक्री कुंभार वसाहतीसह उपनगरातील चौकाचौकांत होत होती. २० ते ३० रुपयांना मिळणाऱ्या मातीच्या बैलजोडीची खरेदी करण्यासाठी महाद्वार रोड, जोतिबा रोड, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिंगोशी मार्केट, टिंबर मार्केट परिसरात गर्दी होती. ग्रामीण भागात होणाऱ्या मिरवणुकीसाठी शेतकरी बैलांच्या सजावटीच्या तयारीत मग्न होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67763 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top