प्रशासक पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासक पाहणी
प्रशासक पाहणी

प्रशासक पाहणी

sakal_logo
By

29204
29119
दोन आरोग्‍य निरीक्षकांना कारणे दाखवा
---
प्रशासकांकडून कारवाई; कचरा उठाव, नालेसफाई नसल्याबद्दल नोटीस
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर व पांजरपोळ या औद्योगिक वसाहतीत कचरा उठाव, स्वच्छता, गटार सफाई होत नसल्याबद्दल प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, सुशांत कवडे यांना पाच हजारांचा दंड का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली.
७२ तासांत लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. काल (ता. १३) अधिकाऱ्यांबरोबर फिरती करताना परिसरात स्वच्छता नाही, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, नाला, गटरची स्वच्छता नसल्याचे प्रशासक बलकवडे यांना दिसले. नागरिक व उद्योजकांनी वेळेत कचरा उठाव, स्वच्छता, गटर्स व चॅनेलची सफाई होत नसल्याचे सांगितले. दरम्यान, लक्ष्मीपुरी येथील रिलायन्स मॉलसमोरील रस्त्यावर सांडपाणी निर्गतीसाठी पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. त्याची प्रशासक बलकवडे यांनी पाहणी केली. दोन दिवसांत काम पूर्ण करण्याचे निर्देश उपशहर अभियंता नारायण भोसले यांना दिले. मॉलच्या बाजूने नाल्यात गेलेला चॅनेल साफ करण्याच्या सूचना दिल्या. वाय. पी. पोवारनगर येथील उद्यमनगर सोसायटीमागील नाल्याच्या सफाई कामाची पाहणी केली. तिथे गाळ साठवून न ठेवता उठाव करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांना दिल्या. व्यापाऱ्यांशी नालासफाईबाबत चर्चा करून तक्रारी असल्यास उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67884 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top