सिटीझन फोरम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिटीझन फोरम
सिटीझन फोरम

सिटीझन फोरम

sakal_logo
By

२९१५८

संभाव्य पूरस्थिती
टाळण्याचे नियोजन करा
सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः संभाव्य पूरस्थिती टाळण्याचे नियोजन करण्याची मागणी आज सिटीझन फोरमच्या शिष्टमंडळांने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्याकडे केली. धरणांच्या पाणी साठ्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्याकडे केली.
अलमट्टी हटाव, महाराष्ट्र बचाव अशी स्थिती राज्यात असल्याचे सांगून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात समन्वय आवश्‍यक आहे. काही पातळीवर दोन्ही राज्यात समन्वय दिसतो हे कौतुकास्पद असल्याचेही फोरमचे प्रसाद जाधव यांनी सांगितले. हवामान विभागाने आणि माध्यमांनीही यावर्षीही शंभर टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अलमट्टीच्या धरण साठ्यामुळे होणारा फुगवटा व त्यामुळे होणारी पूरस्थिती गंभीर आहे. संभाव्य पूरस्थितीबाबत केंद्रीय जल आयोग व राष्ट्रीय व राज्य आपतकालीन विभाग यांच्यात समन्वय असावा या मागणीसाठीही निवेदन देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
शिष्टमंडळात रमाकांत आंग्रे, राजवर्धन यादव, रणजीत पवार, संजय घाटगे, वैभवराज राजेभोसले, गणेश शिंदे, आकाश शेलार, राजेंद्र थोरवडे, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत चिले, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67928 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top