गोडसाखर निवृत्त कामगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोडसाखर निवृत्त कामगार
गोडसाखर निवृत्त कामगार

गोडसाखर निवृत्त कामगार

sakal_logo
By

कामगारांची देणी देण्यास टाळाटाळ
गोडसाखर कारखाना; कामगारांचे जाणीवपूर्वक हाल करण्याचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १४ : गोडसाखर कारखान्याचे निवृत्त कामगारांच्या थकीत देणीसंदर्भात कारखाना प्रशासन व ब्रिस्क कंपनीविरोधात कामगार न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात ८ टक्के व्याजाने कर्मचाऱ्‍यांना देय रकमा देण्याचा आदेश झाला आहे. कामगार न्यायालयातच वसुलीचा दावाही सुरू आहे. त्यात कारखाना व कंपनी हजर राहण्यास टाळाटाळ करून जाणीवपूर्वक कामगारांचे हाल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप निवृत्त कामगारांनी निवेदनातून केला आहे.
कारखान्याचे प्रशासक अरुण काकडे यांना याबाबत निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कारखान्याकडे २७ कोटी ८६ लाख शिल्लक असून, त्यापैकी एफआरपी व अन्य देणी देऊन १ कोटी ८६ लाख शिल्लक राहतात, असे प्रशासकांनीच वार्षिक सभेत सांगितले. त्या आधीही उपलब्ध रकमेतून निवृत्त कामगारांना थोडी का होईना देणी देण्याचे सांगितले होते. वार्षिक सभेत निवृत्त कामगारांची देणी तातडीने देण्यात यावीत असा ठराव एकमताने झाला आहे. यामुळे येत्या दोन-चार दिवसांत सदरची रक्कम निवृत्त कामगारांशी चर्चा करून ती देण्याची व्यवस्था करावी.
दहा वर्षे निवृत्त होऊनही देणी न मिळाल्याने निवृत्त कामगारांनी वेगवेगळ्या माध्यमातून एक वर्षापासून आंदोलने करीत आहेत. तरीही संबंधितांना याप्रकरणी दया आलेली नाही. ब्रिस्क कंपनी कोठे आहे, त्यांचे जबाबदार घटक कोण आहेत, त्यांच्या संपर्कासाठी काय करावे, याची माहितीही मागितली होती. दोन महिने झाले अद्याप ती मिळाली नाही. कामगारांच्या देणींकडे कारखाना प्रशासनाने कधीही माणुसकीने व सहानुभूतीने पाहिलेले नाही. शासनाचे प्रतिनिधी म्हणून प्रशासकांनी या कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे.
निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत, रणजित देसाई, बाळासाहेब लोंढे, महादेव मांगले, लक्ष्मण देवार्डे, सुरेश पाटील, दिनकर खोराटे, सुभाष पाटील, बबन पाटील, श्रीकांत रेंदाळे, वसंत चौगुले, अरुण लोंढे, अशोक कांबळे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67946 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top