फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूक
फसवणूक

फसवणूक

sakal_logo
By

बनावट सोने तारण ठेवून
बँकेला १३ लाखांचा गंडा
११ जणांवर गुन्हा; व्हॅल्युएटरसह कर्जदारांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ ः बँकेत बनावट सोने तारण ठेवून १३ लाख ४६ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी व्हॅल्युएटरसह (मुल्यनिर्धारक) कर्जदार अशा ११ जणांवर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गुन्हा नोंद करण्यात आलेल्या संशयितांची नावे ः संतोष भालचंद्र तांबे (राजारामपूरी ८ वी गल्ली, टाकाळा), सचिन सुरेश सुतार (लक्षतीर्थ वसाहत), राजू तानाजी जाधव (लाड चौक, शिवाजी पेठ), यतीन कुमार वाडकर (राजारामपुरी), सुहास साताप्पा मोहिते (मोरे माने नगर), अनिकेत बळवंत कदम, प्रकाश विष्णू बुचडे (दोघे यवलूज, ता. पन्हाळा), दिलीप गंगाराम चौगले (खोपडेवाडी, ता. गगनबावडा), सागर रामचंद्र दवडते (फुलेवाडी), अभिषेक किशोर पाटील (मोरे-माने नगर), शुभम विश्वास जाधव (नागदेववाडी, ता. करवीर) अशी आहेत.
पोलिसांनी सांगितले, संभाजीनगर येथे जना स्मॉल बँकेची शाखा आहे. येथे संशयित संतोष तांबे यांची सोने तारण कर्ज प्रकरामध्ये तारण सोन्याची सत्यता व व्हॅल्युएशन करण्यासाठी नियुक्ती केली आहे. व्हॅल्युएटर आणि कर्जदार अशा ११ संशयितांनी संगणमत करून बनावट सोने तारण ठेवून कर्ज प्रकरणे मंजूर करून घेऊन १६ लाख ३३ हजार ३२५ रूपये घेतले. हा प्रकार २८ ऑक्टोबर ते ८ डिसेंबर २०२१ या कालावाधित घडला. त्यापैकी २ लाख ८७ हजार ०७९ इतकी रक्कम कर्जावर जमा केली. पण उर्वरित रक्कम १३ लाख ४६ हजार २४६ रूपये भरणा न करता बँकेची फसवणूक केली. अशी फिर्याद बँकेच्या वतीने अनिस सिकंदर पठाण यांनी दिली. त्यानुसार संबधित संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67953 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top