इचल : चौंडेश्वरी सूतगिरणी निवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : चौंडेश्वरी सूतगिरणी निवडणूक
इचल : चौंडेश्वरी सूतगिरणी निवडणूक

इचल : चौंडेश्वरी सूतगिरणी निवडणूक

sakal_logo
By

चौंडेश्वरी सूतगिरणीसाठी दुरंगी लढत
पंचवार्षिक निवडणूक; विद्यमान उपाध्यक्ष हजारे, खिलारे विरोधकांच्या गोटात
इचलकरंजी, ता. १४ ः येथील चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. चौंडेश्वरी सत्तारुढ पॅनेल व चौंडेश्वरी विरोधी पॅनेलमध्ये निवडणूक होणार आहे. सत्तारुढ गटातून वगळलेले विद्यमान उपाध्यक्ष श्रीकांत हजारे व मागासवर्गीय गटातील संचालक डॉ. विलास खिलारे यांना विरोधी गटाने उमेदवारी दिली. सत्तारुढ गटाच्या पॅनेलमध्ये सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
कोष्टी समाजाची म्हणून चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी ओळखली जाते. एकूण १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी ओबीसी गटातून गंगाधर तोडकर सत्तारुढ गटाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. उर्वरीत १६ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात उतरल्याचे आज माघारीदिवशी स्पष्ट झाले. सत्तारुढ पॅनेलचे १६, विरोधी पॅनेलचे १६ तर २ अपक्षांचा समावेश आहे. नितीन भूते व पुंडलीक वरुटे या दोन अपक्षांनी यंत्रमाग व हातमाग विणकर गटातून उमेदवारी दाखल केली आहे.
सत्तारुढ गटाने श्री. हजारे व डॉ. खिलारे यांना वगळले. त्यांनी विरोधी गटाच्या पॅनेलमधून उमेदवारी जाहीर केली. सत्तारुढ गटातून विद्यमान ११ संचालकांसह सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. २६ जूनला मतदान होणार आहे. तत्पूर्वी, दोन्ही पॅनेलकडून प्रचाराचा धुरळा उडणार असल्यांने ही निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.
सत्तारुढ पॅनेलचे उमेदवार ः किशोर बोळाज, जालंदर दाते, कृष्णात धुत्रे, सुरेंद्र गदाळे, रामचंद्र होगाडे, श्रीकांत कबाडे, रामचंद्र मेटे, प्रकाश निमणकर, शिवाजी रेडेकर, सुनिल सांगले (विद्यमान अध्यक्ष), विलास सालमाळगे (यंत्रमाग व हातमाग विणकर गट), निवास कांबळे (अनुसूचित जाती जमाती गट), वासंती होगाडे, उज्वला डाके (महिला प्रतिनिधी), बाळकृष्ण ढवळे (भटक्या विमुक्त जाती, जमाती), - गंगाधर तोडकर (इतर मागास गट-बिनविरोध).
विरोधी पॅनेलचे उमेदवार असे ः राजेंद्र बिद्रे, गोविंद ढवळे, गजानन होगाडे, कुमार कबाडे, संजय कांबळे, शिरीष कांबळे, गजानन खारगे, विजय मुसळे, मनोहर मुसळे, विलास पाडळे, अरुण साखरे, महेश सातपूते (सर्व यंत्रमाग व हातमाग विणकर गट), विलास खिलारे (अनुसूचित जाती जमाती गट), सुवर्णा सातपूते, ज्योती वरुटे (महिला प्रतिनिधी), श्रीकांत हजारे (भटक्या विमुक्त जाती, जमाती).

दृष्टिक्षेपात
२६ जूनला मतदान
ओबीसी गटातून तोडकर बिनविरोध
१६ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात
सत्तारुढ पॅनेलमधून सहा नव्या चेहऱ्यांना संधी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67954 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top