बेळगाव ः तिघा तोतया अधिकाऱ्याना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेळगाव ः तिघा तोतया अधिकाऱ्याना अटक
बेळगाव ः तिघा तोतया अधिकाऱ्याना अटक

बेळगाव ः तिघा तोतया अधिकाऱ्याना अटक

sakal_logo
By

तोतया एसीबी अधिकाऱ्यास
अटक; संबंधित बस्तवाडचा
बेळगाव ः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे (एसीबी) सांगत शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून पैशाची मागणी करणाऱ्या कोल्हापूर येथील एका तोतया एसीबी अधिकाऱ्यासह तिघांना अटक केली आहे. सायबर ईकॉनॉमिक्स नारकोटिक्स (सीईएन) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुरीगेप्पा निंगाप्पा कुंभार (सदलगा, ता. चिकोडी), राजेश बापूसो चौगुले (रा. बस्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) आणि रजनीकांत नागराज ऊर्फ एम. एन. रजनीकांत (रा. मुगळी, जि. हसन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वरिष्ठ विभागीय परिवहन अधिकारी (आरटीओ) इरण्णा रामण्णावर यांनी फिर्याद दिली होती. पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी तिघा संशयितांना अटक केली. ‘आम्ही एसीबी अधिकारी आहोत. तुमच्याविरोधात आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे आपल्या घरावर तसेच कार्यालयावर छापे टाकले जातील. आपल्या खात्यात पैसे जमा केले नाहीत, तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील’, अशी धमकी ते आरटीओ, उपनोंदणी अधिकारी, महसूल खात्याचे अधिकारी त्याचबरोबर विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना देत होते. या तिघा तोतया एसीबी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती जणांना गंडविले आहे, याबाबत चौकशी करण्याक येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y67983 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top