नालेसफाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालेसफाई
नालेसफाई

नालेसफाई

sakal_logo
By

29424
29425
सकाळचे लक्ष आहे लोगो
व आवाहन चौकट

नाल्याची रूंदी झाली कमी

गटारवर कॉंक्रिट स्लॅब; गाळ काढण्यास अडचण

कोल्हापूर, ता. १५ ः पार्वती टॉकीजजवळील एम.जे.मार्केटच्या पाठीमागील जागेतील नाल्याची रूंदी कमी झाली आहे. टॉकीजसमोरील गाळ्यांच्या दारातून गेलेली मोठी गटार कॉंक्रिट स्लॅबने झाकली आहे. त्यामुळे त्यातील गाळ काढणे शक्य नसल्याचे कृती समितीने आज केलेल्या पाहणीत दिसून आले. ट्रेड सेंटरच्या पिछाडीपासून वाहत जाणारा नाला तर कचऱ्याने भरला असल्याचे दिसून आले. एम.जे.मार्केटसमोरील, गवत मंडई ते कुंभार गल्लीत जाणारा, बसंत बहार टॉकीजशेजारील, केव्हीज पार्कमधून राजहंस प्रिटिंग प्रेसमार्गे जाणाऱ्या नाल्यांची पाहणी केली. त्यावेळी गाळ काढला नसल्याचे दिसून आले. बसंत बहार टॉकीजशेजारील नाला काटकोनात वळवला गेला आहे. या पाच ठिकाणच्या नाल्यांमुळे २०१९ व २०२१ मधील पुराचे पाणी तुंबले होते. रस्त्यावरील वाहतूकही थांबली होती. एम.जे.मार्केटच्या पाठीमागील जागेत असणाऱ्या नाल्याची रूंदी कमी झाल्याचे समितीला दिसून आले. तसेच रस्त्याशेजारी असलेल्या नाल्यावर कॉंक्रिट स्लॅब टाकला आहे. त्यातून कचरा वाहत येऊन अडकल्यास तो काढता येणार नाही. याशिवाय नाले, गटार स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांना १७०० घमेली, १७०० खोरी, पार मिळाव्यात अशी मागणी भांडार विभागाकडे केली आहे. तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आजची पाहणी ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, श्रीकांत पाटील, अविनाश दिंडे यांनी केली.
----------------
प्रतिक्रिया
भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही तर घरांत पाणी जाणार आहे. शाहू कॉलनीतील नागरिकांनी ड्रेनेज सोडल्याने भागात डासांचे प्रमाण वाढले आहे. डेंगी, मलेरियाची साथ सुरू होण्याची महापालिका वाट पाहते का असा सवाल नागरिक विचारत आहेत. वेळीच लक्ष न दिल्यास आंदोलन करावे लागेल.
- एस. आर. डवर, बालाजी पार्क

मोरेवाडीकडून शिवाजी विद्यापीठ कंपाउंड लगत जाणारा ओढा तसेच आर. के. नगरच्या मध्यभागी असलेला पुलाखालील कचरा पाऊस आल्यावर ओढ्यात वाहून जाणार आहे. त्याकडे लक्ष दिलेले नाही.
अनुराधा सामंत, मोरेवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68142 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top