गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम
गडहिंग्लज : जागतिक योग दिनानिमित्त येथील योग विद्या धाम, नगरपरिषद व सर्व शासकीय कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे सहाला आजरा रोडवरील योग भवनात सामूहिक योग साधना होईल. सकाळी सातला सर्व शाळात सामूहिक योग साधना होणार आहे. तर साडेसातला योग विद्या धाम, संत गजानन आयुर्वेदिक महाविद्यालय व केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयातर्फे किल्ले सामानगड व काळभैरी डोंगराव योगा प्रोटोकॉलची आसने होणार आहेत. साडेआठला बॅ. नाथ पै विद्यालयापासून योग दिंडी निघेल. सकाळी दहाला कोड्ड कॉलनीत वृक्षारोपण केले जाणार आहे. तर सायंकाळी चारला प्रा. पवनकुमार पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. तणामुक्त जीवन हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर ते मार्गदर्शन करतील. पालिकेच्या शाहू सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------
घाळी महाविद्यालयात केमक्विज-२०२२
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे केमक्विज-२०२२ उत्साहात झाले. बीएसस्सीच्या तिसऱ्या वर्षातील ६७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पंढरीनाथ भोसले, मनाली पोवार, विनायक गायकवाड, शुभम कावळे, शीतल काटकोळी यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. यशस्वी विद्यार्थ्यांचा कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, विभाग प्रमुख डॉ. के. एन. पाटील, प्रा. एस. डी. जाधव, प्रा. ए. जी. गोडघाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. आर. एस. पाटील, प्रा. आर. एस. कांबळे, प्रा. व्ही. एस. इंगळे, प्रा. पी. एस. डाफळे, प्रा. आर. जी. नागरपोळे, प्रा. के. एस. धनवडे, प्रा. एस. एम. यादव, प्रा. एस. एन. जाधव, प्रा. एस. एस. माने आदी उपस्थित होते.
-------------------------------
आशुतोष लोहारला सुवर्णपदक
गडहिंग्लज : येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलचा विद्यार्थी आशुतोष लोहार याने तयार केलेल्या सुडोकूची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. ४९ बाय ४९ चे तयार केलेले हे सुडोकू पजल (कोडे) सर्वात मोठे कोडे ठरले आहे. अॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते आशुतोषचा सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण यांनी त्याचे अभिनंदन केले.
---------------------------------
आशिष चौगुलेची निवड
गडहिंग्लज : येथील रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय व अमेरिकन जपान कराटे असोसिएशनचा विद्यार्थी आशिष चौगुले याने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. १८ वर्षांखालील गटात त्याने हे यश मिळविले. बालेवाडी (पुणे) येथील शिवछत्रपती स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. आशिषची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्राचार्य विजय चौगुले यांच्या हस्ते आशिषचा सत्कार करण्यात आला. उपप्राचार्या अनिता चौगुले, प्रा. सुनील देसाई यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते. दत्ता हजारे व प्रा. दयानंद ग्वाडी यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68144 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top