
इचल : विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत
प्रवेशोत्सव
---------------
माई बाल विद्यामंदिर
इचलकरंजी : माई बाल विद्यामंदिरात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. शाळेच्या प्रवेशद्वाराशी भीम, श्रीकृष्ण, कार्टून यांनी मुलांचे मन जिंकून घेतले. शाळेच्या प्रवेशद्वाराला रंगीत फुग्यांची कमान केली होती. त्यानंतर येणाऱ्या मुलांचे माई महिला मंडळ अध्यक्षा प्रा. निर्मला ऐतवडे, पदाधिकारी माधुरी मर्दा, मीना तोसनिवाल, मुख्याध्यापिका शैला कांबरे, बालवाडी विभाग प्रमुख सविता वठारे यांनी औक्षण केले. तसेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली. संस्थेचे सल्लागार डॉ. एस. पी. मर्दा, निकिता शहा, सुनीता सूर्यवंशी उपस्थित होत्या. पहिल्या दिवशी गोड खाऊ व रंगभरणची पुस्तके वाटप केली. सूत्रसंचालन सौ. मनीषा पाटील व आभार सौ. लता नाईक यांनी मानले.
----------
चौगुले विद्यामंदिर
जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित कै. सौ. डॉ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्या मंदिरमध्ये नवागतांचे स्वागत ढोल तशाच्या गजरात पुष्पवृष्टी करून केले. संस्थेचे अध्यक्ष सुभाष काडाप्पा यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केले. स्वागत मुख्याध्यापिका सौ. वर्षा हुल्ले यांनी केले. प्रास्ताविक शालेय समितीचे अध्यक्ष तीर्थकर माणगावे यांनी केले. नवागत व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय समितीचे उपाध्यक्ष सी. डी. लडगे यांच्याहस्ते फुगे, पेन्सिल चॉकलेट व पाठ्यपुस्तकाचे वाटप केले.
-----------------
पाराशर शैक्षणिक संकुल
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील पाराशर शैक्षणिक संकुलात नवागत विद्यार्थ्यांच्या ‘प्रवेशोत्सव’ कार्यक्रम झाला. संस्था कार्यालयीन अधिकारी कौस्तुभ गावडे, सरपंच प्रकाश देशमुख, पाराशर विकास संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मोरे, आजीव सेवक प्राचार्य शशिकांत काटे, माजी उपसरपंच मेहबूब शिगावे, एम. के. जाधव आदींच्याहस्ते स्वागत केले. विद्यार्थ्यांनी सुसंस्कार व गुणवत्ता वाढीची शपथ घेतली. गावडे, काटे यांनी मार्गदर्शन केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68189 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..