पान एक-आंबोली, तिलारी वनक्षेत्र संरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-आंबोली, तिलारी वनक्षेत्र संरक्षित
पान एक-आंबोली, तिलारी वनक्षेत्र संरक्षित

पान एक-आंबोली, तिलारी वनक्षेत्र संरक्षित

sakal_logo
By

२९४७२
तिलारी वनक्षेत्र (संग्रहित छायाचित्र)

आंबोलीसह तिलारीचे वनक्षेत्र संरक्षित
जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव; राज्याकडून अधिसूचित प्रक्रिया पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले दोडामार्ग वनपरिक्षेत्रातील तिलारी येथील २९.५३ चौरस किलोमीटर क्षेत्रासह आंबोली आज राज्याकडून अधिसूचित करण्यात आले. या सोबतच विशाळगड, पन्हाळगड, मायणी, चंदगड, मुनिया आणि महेद्री अशी नऊ संवर्धन राखीव क्षेत्रे अधिसूचित झाली आहेत.
राज्याने अडीच वर्षांपूर्वी संरक्षित वनाचे क्षेत्र वाढवत १७५०.६३ चौरस किलोमीटरची २३ नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे घोषित केली होती. यामध्ये सिंधुदुर्गातील तिलारी व आंबोली वनपरिक्षेत्राच्या भागाचा समावेश होता. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे क्षेत्र अधिसूचित केल्याने या भागात वन्यजीव संवर्धनासाठी चालना मिळणार आहे. तिलारी वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाघ, हत्ती, बिबट्या, गवा, सांबर, पिसोरी, चौसिंगा आदी वन्य प्राण्यांचा वावर आहे. शिवाय विविध प्रकारच्या वनस्पतींनी हा परिसर समृद्ध आहे. वन्यजीवांचा हा अधिवास संरक्षित होण्याच्या दृष्टीने हा परिसर अधिसूचित करणे गरजेचे होते.
दोन वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी नऊ क्षेत्रे आज अधिसूचित झाली असून, उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे. संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये तिलारी (२९.५३), जोर जांभळी (६५.११), आंबोली दोडामार्ग (५६.९२), विशाळगड (९२.९६), पन्हाळगड (७२.९०), मायणी पक्षी संवर्धन (८.६७), चंदगड (२२५.२४), गगनबावडा (१०४.३९), आजरा भुदरगड (२३८.३३), मसाई पठार (५.३४), नागपूर जिल्ह्यातील मुनिया (९६.०१), मोगरकसा (१०३.९२), अमरावती जिल्ह्यातील महेंद्री (६७.८२), धुळे जिल्ह्यातील चिटबावरी (६६.०४), अलालदरी (१००.५६), नाशिक जिल्ह्यातील कळवण (८४.१२), मुरागड (४२.८७), त्र्यंबकेश्वर (९६.९७), इगतपुरी (८८.५०), रायगड जिल्ह्यातील रायगड (४७.६२), रोहा (२७.३०), पुणे जिल्ह्यातील भोर (२८.४४), सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे, १.०७, कंसातील आकडे चौरस किलोमीटरमध्ये) यांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68210 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top